फार्मा कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी 350 कोटी रुपये अंतरिम लाभांश वितरित करण्याचं जाहीर केलं आहे. कंपनीने 28 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-2025 साठीचा अंतरिम (Ajanta Pharma Dividend) लाभांश मंजूर केला आहे.

फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी अजंता फार्माने (Ajanta Pharma Dividend) सोमवार 28 ऑक्टोबर 2024 ला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर 2024) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकालाबरोबर अजंता फार्माने आपल्या भागधारकांसाठी विशेष लाभांश सुद्धा जाहीर केले, हा भागधारकांसाठी बक्षीस असल्यासारखे आहे. अजंता फार्मा ने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी आपला पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला.
किती लाभांश जाहीर केला
कंपनीच्या संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा पहिला अंतरिम (Interime Dividend) लाभांश जाहीर केला आहे. संचालक मंडळाने सांगितल्याप्रमाणे, 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या अजंता फार्माच्या प्रत्येक शेअरला 28 रुपये लाभांश भागधारकांना मिळेल. अजंता फार्मा कंपनी देणार 350 कोटी रुपये लाभांश म्हणून वितरित करेल. या लाभांश टक्केवारी मध्ये पहिलं तर 1400 टक्के इतका प्रमाण आहे. अजंता फार्मा ने आतापर्यंत च्या कार्यकाळात एवढा लाभांश दिला नव्हता, या चालू आर्थिक वर्षातील कंपनीने दिलेला सर्वात मोठा (Ajanta Pharma Dividend) लाभांश आहे.
अजंता फार्मा कंपनीचा निव्वळ नफा किती
अजंता फार्माने जुलै- सप्टेंबर तिमाहीत च्या निकालानंतर 215.98 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षीच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत 195 कोटी निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षात मागील वर्षांपेक्षा हे प्रमाण 11 टक्कयांनी वाढलं आहे. अजंता फार्मा कंपनीचा महसूलही सप्टेंबर तिमाहीत 5 टक्क्यांनी वाढून 1,188 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत हा आकडा 1,027.98 कोटी रुपये होता.
इतक्या भागधारकांना लाभांशाचा फायदा
कंपनीच्या 64,318 भागधारकांना या अंतरिम ((Ajanta Pharma Dividend)) लाभांशाचा लाभ होणार आहे. 28 रुपये प्रति शेअर या लाभांशासह चालू आर्थिक वर्षात अजंता फार्माचे एकूण पेआउट रुपये 700 कोटीच्या पुढे जाईल, जे चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत रोख 90 टक्केइतकं झालं आहे.
अजंता फार्मा लाभांश रेकॉर्ड तारीख
अजंता फार्मा कंपनीच्या भागधारकांना हा 350 कोटी रुपये (Ajanta Pharma Divided) लाभांश वितरित करण्यासाठी रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे.फार्मा कंपनीने भागधारकांची पात्रता ठरवण्यासाठी 6 नोव्हेंबर 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे म्हणजे 6 नोव्हेंबर 2024 पर्यंत जे भागधारक कंपनीच्या रेकॉर्ड मध्ये असतील त्यांना हा लाभांश वितरित केला जाणार आहे. अजंता फार्मा कंपनीने सांगितले की 15 नोव्हेंबर 2024 रोजी किंवा त्यानंतर लाभांश चे 350 कोटी रुपये किंवा 28 रुपये प्रति शेअर प्रमाणात दिला जाईल.
शेअर्समध्ये घसरण सुरू
अजंता फार्माचे (Ajanta Pharma Dividend) शेअर्स मंगळवारी बीएसईवर 2.45 टक्क्यांच्या घसरणीसह 2925 रुपयांवर बंद झाले. तर बुधवारी शेअर्स वधारून 2924.30 ला उघडून 2984 रुपयांवर गेला आहे. अजंता फार्माचे बाजार भांडवल 30 ऑक्टोबर 2024 रोजी 36,537 कोटी रुपये झाले आहे.
महत्त्वाचे हे वाचा : IPO Meaning in Marathi | प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) म्हणजे काय