ETF Meaning in Marathi: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ETF Meaning in Marathi: ETF म्हणजे “एक्स्चेंज-ट्रेडेड फंड” हा एक प्रकारचा गुंतवणूक फंड असतो जो शेअर मार्केटमध्ये स्टॉकप्रमाणे खरेदी-विक्री केला जातो. ETF म्हणजे असे फंड असतात, जे वेगवेगळ्या शेअर्स, बाँड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना कमी खर्चात वेगवेगळ्या प्रकारे फायदा मिळवून देतात.


etf meaning in marathi
Source: bhandval.com

ETF चे फायदे किंवा उद्दिष्ट काय आहे?

ETF सुरू करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक सोयीस्कर, किफायतशीर, आणि विविधता असलेला गुंतवणूक पर्याय निर्माण करणे. ETF पहिल्यांदा 1990 च्या दशकात अमेरिकेत सुरू करण्यात आले होते आणि यामागचे  काही मुख्य फायदे खालीलप्रमाणे होती:

  1. विविधता मिळवणे सोपे करणे: ETF मधून गुंतवणूकदार एकाच वेळी अनेक प्रकारचे स्टॉक्स किंवा बाँड्समध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे एकाच वेळी विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करता येते आणि विविध मार्गांनी फायदा मिळवता येतो.
  2. कमी खर्चात गुंतवणुकीची संधी: ETF चे व्यवस्थापन खर्च (expense ratio) तुलनेने कमी असतात, कारण हे फंड साधारणपणे व्यवसायिक फंड मॅनेजर च्या देखरेखीखाली असतात, म्हणजेच ते विशिष्ट निर्देशांक फॉलो करतात आणि फंड मॅनेजरला जास्त सक्रिय व्यवस्थापनाची गरज नसते.
  3. दिवसाच्या व्यवहाराची सुविधा: ETF स्टॉक्सप्रमाणे शेअर बाजारात दिवसभर खरेदी-विक्रीसाठी खुले असतात, जे म्युच्युअल फंड्सपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिवसाच्या किंवा शेअर मार्केट च्या वेळेनुसार खरेदी-विक्री करता येते.
  4. सुविधाजनकता आणि पारदर्शकता: ETF दररोज त्यांच्या पोर्टफोलिओची माहिती उपलब्ध करून देतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीबाबत पारदर्शकता मिळते.
  5. सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्धता: लहान गुंतवणूकदार जे एकाच वेळी मोठी रक्कम विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ETF एक योग्य पर्याय ठरला. ते लहान गुंतवणुकीतूनही विविधता मिळवू शकतात.

ETF ने गुंतवणूकदारांना कमी खर्चात, सोप्या पद्धतीने आणि विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली. त्यामुळे ETF गुंतवणूकदारांच्या गरजांना अधिक चांगले जुळवून देणारा आणि आर्थिक नियोजनाला उपयुक्त असणारा एक पर्याय बनला आहे.

ETF चे विविध प्रकार कोणते आहेत?

ETF चे विविध प्रकार आहेत, जे त्यांच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर आधारित असतात. ETF चे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

1. इक्विटी ETF

हे ETF मुख्यतः रोज खरेदी-विक्री होणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. यात विशिष्ट निर्देशांक (Index) जसे की, निफ्टी 50 किंवा सेंसेक्स यासारख्या मार्केट निर्देशांका बरोबर चालतात.

2. बाँड ETF (Fixed-Income ETF)

हे ETF मुख्यतः बाँड्समध्ये म्हणजे सरकारी रोखे, कॉर्पोरेट रोखे किंवा इतर फिक्स्ड इन्कम साधनांमध्ये गुंतवणूक करतात. हे ETF गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्न मिळवून देण्यास मदत करतात.


3. कमोडिटी ETF

या प्रकारचे ETF कमोडिटीज जसे की सोने, चांदी, क्रूड ऑइल इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकदारांना विविध कमोडिटीजमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होते.

4. सेक्टर आणि उद्योग-विशिष्ट ETF

हे विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगावर आधारित ETF असतात, जसे की तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, वित्तीय सेवा, इ. हे गुंतवणूकदारांना विशिष्ट क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात.

5. आंतरराष्ट्रीय ETF

हे ETF परदेशातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. ज्या गुंतवणूकदारांना जागतिक स्तरावर गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हे ETF किफायतशीर असतात.

6. इनोव्हेटिव्ह किंवा थीमॅटिक ETF

हे ETF विशिष्ट थीमवर आधारित असतात, जसे की हरित ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता या किंवा आशा विभागावर आधारित असतात. हे विशेष एखाद्या विभागात रस असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी असतात.

7. डिव्हिडेंड ETF

हे ETF मुख्यतः असे शेअर्स निवडतात जे नियमित डिव्हिडेंड देतात. त्यामुळे त्यातून नियमित उत्पन्न मिळू शकते. असे ETF निवडताना गुंतवणूकदारांनी त्यांचा जोखीम सहनशीलता, उद्दिष्टे आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार योग्य शेअर निवडणे आवश्यक आहे.

भारतामध्ये लोकप्रिय आणि उच्च परतावा देणारे ETF कोणते?

भारतीय आर्थिक बाजारात काही उत्कृष्ट आणि उच्च परतावा देणारे ETF (Exchange-Traded Funds) खालीलप्रमाणे आहेत. हे ETF विविध श्रेणींमध्ये विभागलेले आसतात, जसे की इक्विटी, गोल्ड, बँकिंग इत्यादी.

1. निफ्टी 50 ETF

Nifty 50 ETF म्हणजेच Exchange Traded Fund हा शेअर मार्केट मध्ये उपलब्ध असलेला एक गुंतवणूक पर्याय आहे. हे ETF, Nifty 50 निर्देशांकाचे (index) प्रतिनिधित्व करते, म्हणजेच Nifty 50 मध्ये समाविष्ट असलेल्या 50 प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सच्या कामगिरीवर आधारित असते.


Nifty 50 ETF ची फायदे:

  1. Nifty 50 ETF या मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यक नसते; कमी भांडवलातही गुंतवणूक करता येते.
  2. Nifty 50 निर्देशांकात विविध क्षेत्रांतील प्रमुख कंपन्या असतात. त्यामुळे गुंतवणूक विविध क्षेत्रात व विविध कंपन्यांमध्ये राहते.
  3. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत Nifty 50 ETF ची व्यवस्थापन फी कमी असते, त्यामुळे खर्च कमी होतो.
  4. Nifty 50 ETF चे शेअर्स बाजारात इतर शेअर्सप्रमाणेच खरेदी-विक्री करता येतात त्यामुळे कधीही खरेदी-विक्री करण्याची सवलत मिळते.

Nifty 50 ETF मध्ये गुंतवणूक कशी करावी?

1. डीमॅट खाते: Nifty 50 ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट आणि ट्रेडिंग खाते आवश्यक आहे.

2. ब्रोकरची निवड: Nifty 50 ETF मध्ये व्यवहार करण्यासाठी तुम्हाला तुमचा शेअर ब्रोकर मदत करतो.

3. सोयीस्कर वेळेवर खरेदी-विक्री: तुम्ही Nifty 50 ETF बाजारात खुल्या असतानाच खरेदी करू शकता.

Nifty 50 ETF तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्थिरता व दीर्घकालीन वाढ देण्यासाठी उपयुक्त असू शकते.

2. गोल्ड ETF (ETF Meaning in Marathi)

Gold ETF म्हणजेच Gold Exchange Traded Fund हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड असतात, हे ETF सोन्याच्या किंमतींवर आधारित असतात. थोडक्यात, गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक म्हणजे तुम्ही सोन्यात थेट गुंतवणूक न करता, त्याचे युनिट्स खरेदी करता. हे युनिट्स शेअर बाजारात व्यवहार होणाऱ्या इतर शेअर्ससारखेच असतात आणि तुम्ही त्यांना शेअर बाजारात खरेदी – विक्री करू शकता. फिजिकल सोने न बाळगताही, सोने खरेदी करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे, जो सुरक्षितता आणि चांगले परतावा देतो. गोल्डच्या किमती वाढल्या की या ETF चे मूल्यही वाढते.

गोल्ड ETF चे फायदे:

  1. सुरक्षितता: सोने तुमच्याकडे प्रत्यक्ष नसल्यानं त्याच्या चोरीचा किंवा नुकसानाचा धोका कमी होतो.
  2. सुलभता: हे ETF तुम्ही स्टॉक एक्स्चेंजवरून थेट खरेदी-विक्री करू शकता.
  3. कमी खर्च: सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे मेकिंग चार्जेस किंवा इतर खर्च येत नाहीत.
  4. लिक्विडिटी: शेअर बाजारात व्यवहार होत असल्यामुळे तुम्हाला कधीही विकता येते.

गोल्ड ETF कोणासाठी योग्य आहे?

गोल्ड ETF त्यांच्यासाठी योग्य आहे जे सोन्यात गुंतवणूक करू इच्छितात, पण प्रत्यक्ष सोनं सांभाळू इच्छित नाहीत. तसेच, जे लोकं शेअर बाजाराच्या बदलांवर लक्ष ठेवू शकतात.

उदाहरण: SBI Gold ETF, HDFC Gold ETF इ.

गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक कशी करावी?

गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे. मग तुम्ही शेअर बाजारातून गोल्ड ETF खरेदी करू शकता. गोल्ड ETF चे दर शेअर बाजारात सोन्याच्या किंमतींनुसार बदलत असतात, त्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे.

3. बँकिंग ETF

बँकिंग ETF म्हणजे “बँकिंग एक्सचेंज ट्रेडेड फंड”. हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे जो मुख्यतः बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. बँकिंग ETF चे उद्दिष्ट म्हणजे बँकिंग सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरच्या परफॉर्मन्सला ट्रॅक करणे.

बँकिंग ETF मधील गुंतवणुकीचे फायदे:

  1. जोखीम कमी: ETF मध्ये गुंतवणूक केल्यामुळे विविध बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक होते, ज्यामुळे एकाच कंपनीवर अवलंबून न राहता जोखीम कमी होते.
  2. तरलता (लिक्विडिटी): ETF हे शेअर बाजारात सहज खरेदी-विक्री करता येतात.
  3. कमी खर्च: म्युच्युअल फंडांच्या तुलनेत ETF चे व्यवस्थापन शुल्क कमी असते.
  4. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रावर विश्वास असेल आणि त्यात गुंतवणूक करायची असेल तर बँकिंग ETF हे एक चांगले पर्याय असू शकते. बँकिंग ETF मध्ये भारतातील प्रमुख बँकांचे समावेश आहे. हे बँकिंग सेक्टरच्या चडउतारावर अवलंबून असते. 

उदाहरण: ICICI Prudential Banking ETF, SBI Banking ETF इ.

4. निफ्टी नेक्स्ट 50 ETF

Nifty Next 50 ETF हा एक एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) आहे, जो Nifty Next 50 इंडेक्सवर आधारित आहे. Nifty Next 50 हा निर्देशांकामध्ये Nifty 50 मध्ये येणाऱ्या पुढील 50 कंपन्यांचा समावेश असतो, म्हणजेच या कंपन्या Nifty 50 मध्ये नाहीत पण त्या पुढे जाऊन Nifty 50 मध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

ETFs हे स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होणारे फंड्स असतात, ज्यामुळे तुम्ही शेअर्सप्रमाणे त्यांची खरेदी-विक्री करू शकता. Nifty Next 50 ETF मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला या 50 कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो, कारण Nifty Next 50 निर्देशांकात उच्च मार्केट कॅपिटल, पण तुलनेने कमी लोकप्रिय कंपन्या असतात.

Nifty Next 50 ETF चे फायदे:

  1. विविधता: एकाचवेळी एक गुंतवणुकीत 50 कंपन्यांमध्ये थोडी-थोडी गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
  2. कमी खर्च: कुठलाही फंड व्यवस्थापन खर्च कमी असते.
  3. लिक्विडिटी: स्टॉक एक्स्चेंजवर सहज खरेदी आणि विक्री करता येते.

Nifty Next 50 ETF चे धोके:

  1. बाजाराचा धोका: शेअर बाजारातील अस्थिरता ETF वर परिणाम करू शकते.
  2. मर्यादित नफा: थेट शेअर्स मधल्या गुंतवणूकीपेक्षा नफ्याच्या मर्यादा कमी होतात.

Nifty Next 50 ETF मधून नियमित आणि दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी, शिस्तबद्ध गुंतवणूक करणे गरजेच आहे.

उदाहरण: UTI Nifty Next 50 ETF, ICICI Prudential Nifty Next 50 ETF इ.

या ETF मध्ये निफ्टी 50 नंतरच्या पुढील 50 कंपन्यांचा समावेश असतो. Nifty 50 मध्ये पुढे येणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या वाढीमुळे चांगले परतावे मिळण्याची शक्यता असते.

5. IT ETF

उदाहरण. ICICI Prudential IT ETF, Nippon India ETF Nifty IT इत्यादी.

IT सेक्टरमधील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित ETF आहे. जशी जशी IT क्षेत्राचा विकास होत जातो तसे चांगले परतावे मिळतात.

Source: CA Rachana Ranade (Marathi)

गुंतवणुकीसाठी कोणते ETF निवडावे?

आपल्या जोखमीची तयारी, गुंतवणुकीचा उद्देश, आणि गुंतवणुकीचा कालावधी विचारात घेऊन ETF निवडावे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निफ्टी 50 किंवा निफ्टी नेक्स्ट 50 ETF चांगले पर्याय असू शकतात. तुम्हाला सुरक्षित गुंतवणुक करायची असेल तर गोल्ड ETF योग्य आहे.

अस्वीकरण:

भांडवल ब्लॉगवर कुठल्याही गुंतवणूक करण्यासाठी शिफारस केली जात नाही. आम्ही गुंतवणूकदारांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रामाणित गुंतवणूक तज्ञानचा सल्ला घेण्याचा सल्ला देतो.

अधिक जाणून घ्या: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते?

अधिक जाणून घ्या: शेअर मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा?

Leave a Comment