भांडवल हा ब्लॉग शेअर मार्केट आणि भांडवली बाजाराचा मध्यम अनुभव असलेल्या गुंतवणूकदारांनी बनवला आहे. भांडवल या ब्लॉगचा मुख्य उद्देश शेअर मार्केटची विस्तृत माहिती आणि भांडवल बाजारात घडणाऱ्या घडामोडी सर्वात आधी, वाचकांपर्यंत पोहचवणे हा आहे. भांडवल हा ब्लॉग बनवण्यासाठी सारे लेखक, अनुभवी ट्रेडर आणि गुंतवणूकदार रात्रं दिवस मेहनत घेत आहेत. आम्ही भारतीय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग साठी लागणारी सम्पूर्ण माहिती, म्युच्युअल फंड, प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) आणि शेअर मार्केटच्या घडामोडी याबद्दल अचूक आणि जलद माहिती देण्यासाठी कर्तव्यदक्ष आहे.
भांडवल ब्लॉग ची गोष्ट
भांडवल ब्लॉग ची योजना तयार करत असताना सर्व लेखक आणि गुंतवणूकदारांना माहीत होते की, आपण ही वेबसाइट का बनवत आहेत. भारतीय शेअर मार्केट मध्ये काम करू पाहणाऱ्यास मार्केट बद्दलची सम्पूर्ण माहिती आणि बातमी देणे हेच प्राथमिक काम आहे, याच कारणास्तव भांडवल वेब तयार होण्यासाठी एक वर्ष लागलं.
या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारची अध्यायावत माहिती मिळेल-
●शेअर मार्केट
●म्युच्युअल फंड
●एस. आय. पी.
●ट्रेडिंग
●गुंतवणूक
●प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO)
●इतर
भांडवल टीम
Sachin Thorat
सचिन थोरात हे भांडवल.com चे मुख्य संपादक आणि एक शेअर मार्केट ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी बी. फार्म, एम.बी.ए. चं शिक्षण पूर्ण केलं आणि शेअर मार्केटमध्ये गेली ६+ वर्षां ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करत आहेत.
Mithun Bhilare
मिथुन भिलारे हे भांडवल.com चे संपादक आणि एक शेअर मार्केट ट्रेडर आहेत. त्यांनी बी.फार्म, एम.बी.ए. चं शिक्षण पूर्ण केलं आणि शेअर मार्केटमध्ये गेली ७+ वर्षे करत आहेत. ते शेअर मार्केट बद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन सुद्धा करतात.