Systematic Investment Plan:निम्म्या पेक्षा जास्त भारतीयांना माहीत नाही, हा SIP चा नियम माहीत झाला, तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Systematic Investment Plan: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन होय. एसआयपी हा सर्वांसाठी एक वरदान आहे,  एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये थोडी थोडी गुंतवणूक करून करोडपती होता येत हे सिध्द झाले आहे. म्युच्युअल फंड म्हणजे एक अशी योजना आहे जी दर महिन्याला किंवा वर्षांला सामान्य गुंतवणूक दारांचे पैसे एकत्र करून शेअर, बॉण्ड किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करून पैसे वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्युच्युअल फंडाद्वारे जमा केलेले पैसे एक प्रोफेशनल म्युच्युअल फंड मॅनेजर च्या माध्यमातून व्यवस्थापण केले जाते.

Systematic Investment Plan
Source: bhandval.com

Systematic Investment Plan: तुम्ही वयाची 40 शी ओलांडली असेल तर किंवा अजुनपर्यंत च्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा रिटायरमेंट निधी जमा केला नसेल तर तुमचं म्हातारपण हे हलाखीचं असू शकतं. कारण तुम्ही तरुण वयात किंवा कमावत्या वयात कुठल्याही प्रकारचा निधी किंवा गुंतवणूक केलेली नाही. जेव्हा माणसाकडे पैसे किंवा प्रॉपर्टी नसते तेव्हा आपण सर्वांना माहिती आहे की कोणीही विचारत नाही. तुम्ही आयुष्यात एपीएफ किंवा प्रॉपर्टी जमा केला नसेल तरीही तुम्ही एसआयपी च्या माध्यमातून भविष्यसाठी निधी उभारू शकता. तुम्ही आज 40 वर्षाचे असाल तर आज पासून रिटायरमेंट पर्यंत म्हणजे 60 वर्षापर्यंत म्हणजे पुढच्या 20 वर्षांत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एसआयपी च्या माध्यमातून निधी उभा करू शकता. या 20 वर्षांत एसआयपी च्या माध्यमातून पैसे भरत राहिला तर तुम्ही 60 वर्षापर्यंत 5 करोड रुपये जमवू शकता. एसआयपी च्या या पद्धतीला एसआयपी चा 40X20X60 असे म्हणतात. एसआयपी च्या पद्धतीने तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत 5 करोड रुपयांचा निधी जमा करू शकता, तो कसा ते आपण पुढे पाहणार आहोत.

एसआयपी म्हणजे काय?

एसआयपी ला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे म्हणतात. एसआयपी हे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे सक्षम साधन आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) गुंतवणूकदारांचे पैसे शेअर, बॉण्ड किंवा इतर आर्थिक बाजारात गुंतवते, ज्यामुळे त्यांना मुदत ठेवी (FD) आणि बचत योजनांपेक्षा चांगला परतावा मिळतो. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना चक्रवाढीसह म्हणजे व्याजावर व्याज असा परतावा मिळतो.

म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करतात?

म्युच्युअल फंड म्हणजे एक गुंतवणूक योजना आहे जिथे दर महिन्याला पैसे गुंतवणूक करून वाढवू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेलं भांडवल हे शेअर, बॉण्ड आणि इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवले जाते. म्युच्युअल फंड मधून जमा केलेल्या भांडवलाची जबाबदारी ही एक फंड मॅनेजर कडे दिलेली असते, तो मॅनेजर ठरवतो की हा पैसा कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. हा पैसे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचे पैसे असतात ते गुंतवणूक करून जो काही परतावा मिळतो तो आपल्या सारख्या गुंतवणूक दारांना वाटले जातात. तुम्ही ज्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करत आहात त्या फंडाचे मॅनेजर आणि त्या फंडाच बाजार मूल्य याची सर्व माहिती तुम्हाला मिळत असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला थोडी फिस च्या स्वरूपात पैसे द्यावे लागतात.

एसआयपी चा 40X20X50 Systematic Investment Plan सूत्र कसं काम करतं

एसआयपी आणि म्युच्युअल फंड बद्दल एवढी माहिती घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच 40x20x50 सूत्र कसं काम करत आणि हे वापरून कसे करोडपती होऊ शकतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल.(Systematic Investment Plan)

समजा, तुम्ही वयाची 40 वर्षे पूर्ण केले आहेत किंवा 40 वर्षाचे झाले आहेत. तर आजपासून तुम्हाला वर्षाला किंवा दरवर्षी 50,000 रुपये जमा करायला सुरुवात करावी लागेल. ही 50,000 ची दरमहा गुंतवणूक आजपासून पुढे 20 वर्ष प्रत्येक महिन्याला करावयाची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वयाच्या 40 वर्षापासून सतत, दर महिन्याला 50 हजार रुपये एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहाल तेव्हा तुमच्या वयाच्या 60 व्या वर्षी म्हणजे सेवानिवृत्त च्या वेळी तुमच्याकडे 5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असेल. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे.

40x20x50 च्या सूत्राने 5 कोटी कसे जमा होतील?

हे सूत्र तुम्ही पळत असाल तर तुम्हाला करोडपती नक्की बनवते. ते कसं हे समजून घेऊ, जेव्हा तुम्ही 40 व्या वर्षी पासून दर महिन्याला 50,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये जमा करत राहतात तेव्हा तुमचे वर्षांला 6 लाख रुपये जमा होतात. असे करत असताना आपण हे पुढचे 20 वर्ष करणार आहोत, म्हणजे दर वर्षी 6 लाख असे 20 व्या वर्षी 1.20 कोटी रुपये जमा होतात. या सर्व भांडवलावर दर वर्षी 13ल2% च्या हिशोबाने चक्रवाढ व्याज मिळते, त्या व्याजाची रक्कम 3,79,57,400 रुपये एवढी होते. तुम्ही दरमहा 50,000 रुपयांनी 20 वर्ष जमा केलेली रक्कम 1.20 कोटी आणि या रकमेवर 12% च्या हिशोबाने मिळालेले चक्रवाढ व्याज 3,79,57,400 एकत्र केले तर रक्कम होते 4,99,57,400 रुपये.

एसआयपी च्या माध्यमातून किंवा म्युच्युअल फंड च्या माध्यमातून तुम्ही करोडपती नक्की होऊ शकतात. असा हा 40X20X50 चा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला 20 वर्षात करोडपती आणि सेवानिवृत्ती अगदी काहीहि न करता बसून खाण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो.

Disclaimer: शेअर मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी-विक्री करण्यासाठी भांडवल.Com सल्ला देत नाही. आम्ही शेअर मार्केट संबधीत सर्व विश्लेषण हे कंपनी आणि बाजार विश्लेषक यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाशित करत असतो, म्हणून शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी शासनमान्य विश्लेषकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.


अधिक जाणून घ्या: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते?

अधिक जाणून घ्या: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?

Leave a Comment