Mutual Fund in Marathi: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mutual Fund in Marathi: म्युच्युअल फंड हा शेअर मार्केट मधील गुंतवणूक प्रकार आहे. जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी म्हणून गुंतवणूक करत असतो. महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम आपण एकत्र करून एखाद्या कंपनी कडे जमा करतो ज्यावर आपल्याला परतावा मिळतो, म्हणून आपली रक्कम वाढत जाते. चला तर मग म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते त्याबद्दल मराठीमध्ये सपूर्ण  माहिती घेऊया:

म्युच्युअल फंड म्हणजे काय?


म्युच्युअल फंड म्हणजे आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ? अनेक गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे एकत्र करून ते विविध शेअर्स, बॉण्ड्स आणि इतर फायनान्शियल सामग्रीमध्ये गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन एक किंवा अनेक शेअर मार्केटचं सम्पूर्ण शिक्षण आणि ज्ञान असलेले फंड मॅनेजर करतात, जे बाजारातील विविध साधनांमध्ये, शेअर्स मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना सरासरी वार्षीक परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.(Mutual Fund in Marathi)

म्युच्युअल फंडचे प्रकार आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ?

1. इक्विटी फंड:

इक्विटी म्हणजेच शेअर्स शेअर मार्केटला इक्विटी मार्केट सुद्धा म्हणतात, इक्विटी म्युच्युअल फंड हे प्रामुख्याने शेअर बाजारात गुंतवणूक करतात.म्हणजे शेअर मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंज वर नोंद असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये या इक्विटी म्युच्युअल फंडदवारे जमा केलेले भांडवल गुंतवणूक करतात. मागील पाच वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरासरी वार्षिक 19% बढत दिली आहे. त्यामुळे या फंडातील गुंतवणूकदारांचे भांडवल पाच वर्षांत जवळजवळ दुप्पट झाले आहे. या प्रकारचे फंड हे पैसे दुप्पट करणारे फंड कोणते म्हणून ओळखले जातात.

2. डेब्ट फंड:

डेट म्युच्युअल फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे प्रामुख्याने निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये शासकीय रोखे, कर्जरोखे (बॉण्ड्स), ट्रेझरी बिल्स आणि कॉर्पोरेट डेब्ट यांचा समावेश होतो. डेट फंड हे तुलनेने कमी जोखमीचे असतात, कारण यात बाजारातील चढउतारांचा परिणाम कमी होतो. मात्र, यामुळे यांचे परतावे (रिटर्न्स) देखील इक्विटी फंड्सच्या तुलनेत कमी असतात. थोडक्यात, हे म्युच्युअल फंड कर्ज देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात आणि नियमित उत्पन्नासाठी योग्य व सुरक्षित पर्याय आहे.

3. हायब्रिड फंड:

म्युच्युअल फंड जे इक्विटी (शेअर बाजार) आणि डेट (कर्जरोखे) यांचा मिश्र पोर्टफोलिओ तयार करतात. या फंडांचा उद्देश एक स्थिर परतावा मिळवण्याबरोबरच जोखीम कमी करून भांडवलवाढ करणे असतो.हे इक्विटी आणि डेब्ट या दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात.त्यामुळेच जोखमीबरोबर जास्त परतावा मिलण्याची संधीही असते. गेल्या तीन ते पाच वर्षांत हायब्रिड म्युच्युअल फंडांनी 19.50% चा सरासरी वार्षिक परतावा दिला आहे. हायब्रीड प्रकार हा आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ? म्हणून ओळखला जातो.

4. इंडेक्स फंड:

इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे असे फंड जे विशिष्ट निर्देशांकाच्या (Index) कामगिरीशी जुळलेले असतात. या फंडांचा उद्देश निर्देशांकातील (जसे की Nifty 50, Sensex) समभागांमध्ये गुंतवणूक करून त्याच प्रमाणात परतावा देणे असतो. इंडेक्स म्युच्युअल फंड ने गेल्या पाच वर्षात 18.20% सरासरी परतावा देऊन 6 वर्षात पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते? किंवा दुप्पट केले आहे.
Nifty 50 इंडेक्स फंड: हा फंड Nifty 50 निर्देशांकातील 50 प्रमुख कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
Sensex इंडेक्स फंड: हा फंड Sensex निर्देशांकाच्या 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आजच्या डिजिटल युगात सोपे झाले आहे. गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कालावधी, आणि जोखीम क्षमता विचारात घेऊन योग्य फंड निवडणे महत्त्वाचे आहे. येथे म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे;

1. आर्थिक उद्दिष्टे ठरवा:

गुंतवणूक का करायची आहे, याचे उद्दिष्ट ठरवा (उदा. घर, मुलांचे शिक्षण, निवृत्ती).

गुंतवणुकीचा वेळावधी ठरवा – अल्पकालीन, मध्यमकालीन, किंवा दीर्घकालीन.

जोखीम घेण्याची तयारी ठरवा – उच्च, मध्यम, की कमी जोखीम.

2. म्युच्युअल फंडाचा प्रकार निवडा:

इक्विटी फंड: तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल, तर इक्विटी फंड चांगला पर्याय आहे.

डेब्ट फंड: कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्न इच्छित असल्यास डेब्ट फंड निवडा.

हायब्रिड फंड: कमी जोखीम आणि मध्यम परताव्याचा विचार करत असल्यास हायब्रिड फंड निवडा.

इंडेक्स फंड: कमी व्यवस्थापन खर्चासह दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इंडेक्स फंड चांगले ठरू शकतात.

3. KYC प्रक्रिया पूर्ण करा:

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने KYC करू शकता.

4. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) किंवा लम्पसममध्ये गुंतवणूक करा:

SIP मध्ये तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा इतर नियतकालीन रकमेने गुंतवणूक करू शकता. SIP तुम्हाला बाजाराच्या चढ-उतारांमधून दीर्घकाळात चांगला परतावा मिळवून देते.

लम्पसममध्ये जर तुमच्याकडे मोठी रक्कम आहे आणि तुम्हांला एकावेळी गुंतवणूक करायची आहे तर लम्पसम गुंतवणूक करू शकता.

5. ऑनलाइन किंवा ऑफलाइन गुंतवणूक करा:

ऑनलाइन गुंतवणूक: AMCs (Asset Management Companies) च्या वेबसाइटवर जाऊन किंवा म्युच्युअल फंड अॅप्सद्वारे (जसे की Groww, Zerodha Coin,Dhan, Kotak Cherry यासारख्या अप्लिकेशन मध्ये सिद्ध) गुंतवणूक करू शकता. नेटबँकिंग, UPI, किंवा इतर डिजिटल पद्धतींनी पैसे ट्रान्सफर करून गुंतवणूक करता येते.

ऑफलाइन गुंतवणूक:

AMCs म्हणजे म्युच्युअल फंडच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा बँकांच्या माध्यमातून अर्ज भरून ऑफलाइन गुंतवणूक करू शकता.

6. फंडाचा परतावा आणि जोखीम:

गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे परतावा (Returns), जोखीम, आणि त्याचा मागील इतिहास तपासून गुंतवणूक करा. ते शक्य नसेल तर तज्ञांचे मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरू शकते.

7. गुंतवणुकीचे परीक्षण करा:

नियमितपणे तुमच्या गुंतवणुकीचे परीक्षण करा. बाजाराच्या स्थितीनुसार किंवा गरजेनुसार, जोखमीच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.(Mutual Fund in Marathi)

पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ?
mutual fund in marathi

म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत?

1. विविधता (Diversification): तुमचे पैसे अनेक ठिकाणी गुंतवले जातात, ज्यामुळे जोखीम कमी होते.

2. तज्ञ व्यवस्थापन: फंड मॅनेजरकडे गुंतवणुकीचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव असते, त्यामुळे गुंतवणूक योग्य ठिकाणी केली जाते.

3. लिक्विडिटी (Liquidity): म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्ही कधीही विकू शकता, त्यामुळे तुमचं भांडवल अडकून राहत नाही.

4. कमी गुंतवणूक: म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कमी रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता.म्युच्युअल फंड मध्ये अगदी 100 रुपये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता.

निष्कर्ष:

म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात असावी की म्युच्युअल फंड हे शेअर मार्केट च्या चढउतारावर अवलंबून असतात त्यामुळे जोखीम असते, म्हणून आपल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा विचार करून योग्य फंड निवडणे महत्त्वाचे आहे.(Mutual Fund in Marathi)

म्युच्युअल फंडबद्दल विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

म्युच्युअल फंड मॅनेजर कोण असतो?

एका ग्रूपच्या पैशांचे व्यवस्थापन ज्या व्यावसायिक मार्केटचे पूर्ण ज्ञान असलेल्या व्यक्तीद्वारे केले जाते त्या व्यक्तीला व्यावसायिक फंड मॅनेजर (Professional Fund Manager) म्हटले जाते. पैसे योग्य ठिकाणी ठेवून अधिक नफा मिळवणे हे प्रोफेशनल फंड मॅनेजरचे काम आहे. जर आपण हे सोप्या शब्दात सांगायचे तर त्याचे कार्य म्हणजे लोकांकडून ठेवलेल्या पैशाचे नफ्यात रुपांतर करणे.(Mutual Fund in Marathi)

म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरक्षित आहे का?

म्युच्युअल फंड कंपनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत नोंदणीकृत आसतात, जे भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवतात. सेबी मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी काम करते. सेबी वारंवार खात्री करत असते की फंड जमा करणारी कोणतीही कंपनी लोकांची फसवणूक तर करत नाही, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे.(Mutual Fund in Marathi)

(टीप – इथे ही सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी फायनान्स क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Leave a Comment