शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजच्या काळात किंवा तंत्रज्ञानाच्या युगात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी अगदी साधं-सोपं झाल्याचं दिसतं. सर्व गोष्टी अगदी आपल्या जवळ असल्याचं भासतं, एवढंच नाही तर घरात भाजी-पाला पूर्वी भाजी मंडई मधून घेऊन यावा लागत असे, आता ती आपल्या हातातल्या मोबाईल वरून अगदी कमी वेळात घर पोहोच होते. शेअर मार्केट मध्ये सुद्धा  या तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतवणूक आणि ट्रेडींग सोपी झाली आहे, गरज आहे ती फक्त पुरेशा माहितीची.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

चला तर मग शेअर मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग कशी करावी या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यासाठी सर्व प्राथम आवश्यकता असते ती डिमॅट खात्याची, आता हे डिमॅट खातं कसं उघडायच, कुठे ओपन करायचं, कोणता ब्रोकर चांगला आहे, याविषयी आपण दुसऱ्या लेखामध्ये जाणून घेऊ.

स्टेप १: डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट

प्राथमिक आणि दुय्यम मार्केटमध्ये ट्रेडींग आणि गुंतवणूक करण्यासाठी, आपल्याला डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडुन घेणे आवश्यक आहे.शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभ करण्यासाठी, डिमॅट व ट्रेडिंग खात्याला आपल्या बँकखात्याशी जोडुन घ्यावे, नंतर आपल्या बँक खात्यातुन आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी लागनारे पैसे ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यात टाकायचे असतात.

पायरी २: शेअर्सची निवड

पैसे डिमॅट मध्ये जमा झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंटमधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, विक्री किंवा खरेदी करण्यासाठी शेअर्स निवडावे लागतात. निवडलेल्या शेअर्सची आपल्या भांडवलाप्रमाणे खरेदी करू शकतो.खरेदी केलेले शेअर्स आपल्या डिमॅट अकाऊंट च्या होल्डिंग मध्ये जमा होतात, जे शेअर्स आपण आपल्याला हवे तेव्हा शेअर मार्केट च्या वेळेमध्ये विकू शकतो.

पायरी ३: बरोबर किंमतची निवड

शेअर मार्केट मध्ये शेअर ची किंमत योग्य आहे किंवा नाही, हे ठरवण्यासाठी वेगळे प्रमाण आहेत, ते आपण आपल्या दुसऱ्या लेखात पाहणार आहोत. बरोबर किमतीची निवड करत असताना फक्त आपण खरेदी किंवा विक्री करू इच्छित असलेल्या शेअरसाठीची किंमत बरोबर आहे हे पाहायचं असतं. शेअर खरेदी करताना तुम्हाला कोणती किंमत भरायची आहे हे ठरवा. खरेदीदार किंवा विक्रेता तुमच्या विनंतीला प्रतिसाद देण्याची वाट बघा अन्यथा व्यवहार पूर्ण होणार नाही. 

पायरी ४: खरेदी-विक्री व्यवहार

व्यवहारानंतर, तुम्ही शेअर्सची खरेदी करत असाल तर तुम्हाला शेअर्स मिळतात किंवा तुम्ही शेअर्सची विक्री करत असाल तर त्या विक्री नंतर त्याचे पैसे आपल्या डिमॅट खात्यात जमा होतात.

प्राथमिक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, करण्यासाठी आपल्याला डिमॅट ची आवश्यकता असते त्यामुळे आपण आरंभिक सार्वजनिक ऑफरिंग्स (आयपीओ) साठी अर्ज करू शकतो. आयपीओचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर मागणी आणि उपलब्धतेवर कंपनीची शेअर्स संख्या आणि वाटप होते.आयपीओ मध्ये मिळालेले शेअर्स आपण सेकंडरी मार्केट मध्ये विकू शकतो. अशा सोप्या प्रक्रियेद्वारे आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, गुंतवणूक आणि ट्रेडिंग सुरू करू शकतो.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीची साधने कोणती आहेत?

शेअर मार्केट शिकल्यानंतर मार्केट हा संपत्ती निर्माण करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. परंतु संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअर मार्केट मध्ये कोणती साधनं उपलब्ध आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण संपत्ती निर्माण करण्यासाठी चे साधनं कोणते आहेत हे पाहणार आहोत, शेअर मार्केट एक्सचेंज वर चार प्रकारचे फायनान्शियल साधने उपलब्ध आहे. त्यामध्ये

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी,
how to invest in stock market

१. शेअर्स

शेअर म्हणजे समभाग, एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करणे  त्या शेअर प्राइस च्या किंमती एवढा कंपनीचा मालकी हक्क होय. शेअर मार्केटमध्ये शेअर किंवा समभाग हा कंपनीच्या मालकीचे प्रतिनिधित्व करत असतो. आपल्या एखाद्या कंपनीचे समभाग असतील तर कंपनी जेव्हा नफा कमावते तेव्हा शेअर धारकांना लाभांश वितरित केले जातात. याव्यतिरिक्त, शेअर धारकांनी कंपनी चे नुकसान भरले आहे.

२. बॉंड (रोखे)

बाँड ही कर्ज सुरक्षा आहे जी गुंतवणूकदार, फायनान्स कंपनी, सरकार किंवा नगरपालिका यांना कर्ज देण्यासाठी खरेदी करू शकतात. त्याबदल्यात, बाँड घेणारा गुंतवणूकदाराला व्याज देतो आणि बाँड परिपक्व झाल्यावर बॉण्डचे दर्शनी किंवा मूळ रक्कम परत करतो. रोखे ही संपत्ती निर्माण करण्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, कारण त्यांचे मूल्य मार्केट मधील शेअरच्या किमतीप्रमाणे बदलत नाही. बॉण्ड हा कंपनीला भांडवल उभारण्यासाठी फायदेशीर ठरतो.

३. म्युच्युअल फंड (शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी)

म्युच्युअल फंड म्हणजे मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांचे पैसे एकत्रित करणे होय, एकत्रित भांडवल असेल तर हेच सामूहिक भांडवल विविध प्रकारच्या फायनान्शियल साधनांमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकते. म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी, डेब्ट आणि हायब्रिड फंड असे विविध म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत.हा सुद्धा दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्याचा सिध्द झालेला सक्षम मार्ग आहे

म्युच्युअल फंड योजना मार्केट मधे  ठराविक मूल्यासह युनिट्स (NAV) जारी करतात, जे शेअर्स सारख्याच आसतात. आपण जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करु, तेव्हा आपण अशा म्युच्युअल फंडमध्ये युनिट-होल्डर बनत असतो, म्हणजे जेवढं भांडवल आपण यामध्ये गुंतवतो त्या भांडवलाच्या किमतीचे एन.ए.व्ही. म्हणजे युनिट्स आपल्याला मिळतात.

४. डेरिव्हेटिव्ह

डेरिव्हेटिव्ह हा एक शेअर मार्केट मधला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा जोखमीचा मार्ग आहे, ज्याचं मूल्य हे एखाद्या शेअर्सच्या माध्यमातून त्याच शेअर्सची छोटी बाजू ठराविक काळ ट्रेडिंगसाठी प्राप्त होते. डेरिव्हेटिव्हमध्ये शेअर्स, बाँड्स, करन्सी आणि कमोडिटी यांचा समावेश होतो. डेरिव्हेटिव्ह करार हा एक करार आहे ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांच्या किंमतीच्या वेगवेगळ्या अपेक्षांचा समावेश असतो आणि म्हणूनच, त्याच्या किंमतीसंदर्भात या दोघामध्ये चांगले करार होतात.

स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे कमवावे?

शेअर मार्केट हा आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत भाग आहे. आज तरुणाईला आकर्षित करणारा आणि पुरेपूर माहिती घेऊन शेअर मार्केट मध्ये येणाऱ्यांसाठी संपत्ती निर्माण करून देणारा मार्ग आहे. त्यामुळे, सुरुवातीला, आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे आहे.शेअर मार्केट मध्ये पैसे कमवण्यासाठी योग्य ज्ञान, संयम आणि शिस्त असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी असतील तर आपल्याला शेअर मार्केट मध्ये विस्तृत संशोधन करायला सोपं पडेल, त्यानुसार बाजारपेठेचे विश्लेषण करता येते. तुम्ही जोपर्यंत मार्केट ची स्थिती,गती आणि या दोन्हीवर परिणाम करणारे घटक समजून घेऊन निर्णय घेतला तर शेअर मार्केट मध्ये पैसे कमावणे आजून सोईस्कर होते. (शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी)

महत्त्वाचे हे वाचा : भारतातील सर्वात मोठी सौर पीव्ही मॉड्यूल निर्माता

जर आपल्याला आपले कौशल्य सुधारायचे असेल तर आपण वित्तीय साधने आणि त्यांचे फायदे, जसे की ईटीएफ, शेअर्स, फ्यूचर्स आणि पर्याय या सर्वांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केट मध्ये पैसे कमवण्यासाठी डिलिव्हरी, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, मार्जिन ट्रेडिंग इ. बरोबर ऑर्डर प्रकार कोणते आहेत आणि कोणत्या मार्केट मध्ये काय संधी आहे हे शोधाव लागतं. म्हणजेच काय, तर शेअर मार्केट मध्ये सर्व गोष्टींचा अभ्यास करून संधी कुठं उपलब्ध आहे तिथे निर्णय आणि ठराविक जोखीम घेणं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावीआपल्याला पैसे कमवून देते.

निष्कर्ष

शेअर मार्केट मध्ये भांडवल लागत त्याच बरोबर ज्ञान सुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे. आपण आता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकीची साधने कोणती आहेत, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी हे विस्तृत पाहिलं. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक म्हणजे शेअर्सची खरेदी, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स(रोखे) आणि डेरीव्हेटिव या साधनांमध्ये गुंतवणूक करणे होय. संपत्ती वाढविण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती असली पाहिजे.

Leave a Comment