BTST Strategy ही एक शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्री ची पद्दत आहे. मार्केटचा मध्यम अनुभव असलेले ट्रेडर आणि गुंतवणूकदार या स्ट्रॅटेजीने एका रात्रीत लाखों रुपये कमवतात. अशीच एक BTST strategy बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
BTST Strategy म्हणजे काय?
BTST Strategy म्हणजे (Buy Today Sell Tomorrow) आज खरेदी करा आणि उद्या विका अशी स्ट्रॅटेजी होय. या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही आज शेअर खरेदी करून, उद्या घेतलेले शेअर्स विकून त्यावर फायदा कमवता. ही एक शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्री करण्यासाठी वापरली जाणारी लोकप्रिय पद्दत आहे.

BTST Strategy चे नियम
BTST Strategy वापरून तुम्ही लाखों रुपये कमवू शकता पण त्यासाठी काही नियम अगदी तंतोतंत पाळावे लागतात. ते महत्वाचे नियम तुम्ही खाली पाहु शकता.
- BTST Strategy स्ट्रॅटेजी मध्ये शेअर्सची खरेदी किंवा सौदा त्या दिवशी 03:00 वाजल्यानंतर करावी, कारण त्या दिवशी दिवसभर मार्केट ची हालचाल कशी होती याचा अंदाज येतो.
- या स्ट्रॅटेजीने घेतलेला सौदा किंवा खरेदी केलेल्या शेअर्सची विक्री दुसऱ्या दिवशी 10:00 वाजायच्या आतमध्ये करावी. मग त्या सौदयमध्ये फायदा असो वा नुकसान हा सौदा बंद करायचा आहे.
- जर BTST Strategy मध्ये केलेल्या सौदयमध्ये एका रात्रीत 1% चा फायदा होत असेल तर तो सौदा बंद करा किंवा घेतलेले शेअर्स विकायचे आहे.
- सर्वात महत्त्वाचा नियम पडणाऱ्या मार्केटमध्ये BTST Strategy वापरू नये. फक्त तुम्हाला वाटतंय मार्केट वर जाईल म्हणून सौदा किंवा शेअर्स खरेदी करून ठेवू नका.
हे BTST Strategy चे महत्वाचे नियम आणि अटी आहेत. या अटीचं न चुकता पालन करायचं आहे जेणेकरून आपण पुढे होणारं नुकसान थांबवू आणि फायदा वाढवू शकतो.
BTST Strategy काय आहे?
BTST Strategy मध्ये आपल्याला सर्वात आधी आपल्या चार्ट वर काही सेटिंग करायच्या आहेत. प्रथम ज्या शेअर्सची खरेदी करायची आहे त्या शेअर्सचा चार्ट टाईम फ्रेम 1 दिवस (1 Day) लावून घ्या.

त्यानंतर इंडिकेटर ड्रॉपडाऊन मधून व्हॉल्युम इंडिकेटर निवड, त्या व्हॅल्युम इंडिकेटर च्या सेटिंग्ज मध्ये जाऊन व्हॉलूम MA (Moving Average) 50 करा. असे केल्यावर तुमच्या चार्ट वर व्हॉलूम कॅडल्स मध्ये एक मॉविंग अवराज ची लाईन दिसेल. ती लाईन तुम्हाला त्या एक दिवस व्हॉलूम कसा आहे ते दाखवते. व्हॅल्युम हा सौदा घेण्याच्या अगोदरच्या दिवसापेक्षा जास्त असला पाहिजे, मागच्या दिवसाची कँडल ग्रीन असली पाहिजे, आणि क्लोझिंग ही त्याच्या मागच्या दिवसाच्या क्लोझिंग पेक्षा वर झाली पाहिजे.

यामध्ये आपण अजून एक इंडिकेटर वापरून या BTST Strategy ची अचूकता वाढवू शकतो, त्यासाठी आपल्याला चार्टवर इंडिकेटर सेक्शनमधून मुविंग अवरेज क्रोसओव्हर MA Cross Over) वापरायचे आहे. त्यामध्ये थोडी सेटिंग करायची आहे, Moving Average 9 आणि Moving Average 20 वापरायचे आहे, यांचे कलर्स तुमच्या सोईनुसार ठेवू शकता. BTST Strategy चा सौदा किंवा खरेदी करताना या दोन्ही Moving Averages चं तोंड हे वरच्या दिशेने असावे, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही घेत असलेल्या ट्रेड किंवा शेअर्समध्ये फायदा होण्याची संभावना वाढते.

BTST Strategy साठी शेअर्सची निवड कशी करावी?
ही BTST Strategy फक्त शेअर्स मध्येच खरेदीसाठी वापरायची आहे, कारण इंडेक्स किंवा कमोडिटी मध्ये तुम्हाला फायदा होण्याची संभावना नसल्यासारखी आहे. शेअर मध्ये खरेदी विक्री जास्त असल्याने तुम्हाला शेअर्सच्या किंमतीत जास्त चढउतार पाहायला मिळतील आणि त्याचा फायदा घेऊन आपण लाखों रुपये कमवू शकतो.
BTST Strategy साठी शेअर्स निवडताना Large Capital किंवा Mid Capital इंडेक्स मधल्या शेअर्सची निवड करायची आहे.शेअर्सची निवड करत असताना अजून एक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे असा शेअर निवडायचा आहे जो वरच्या पायऱ्या चढत (Higher High and Higher Lows) आहे,ल. एका ठराविक स्थितीत थांबलेला (Sideways) किंवा खालच्या पायऱ्या चढणारा (Lower High and Lower Low) शेअर तुम्हाला निवडायचा नाही आहे.
Examples:
1. हा चार्ट गुरु, 6 जुलै 2023, Reliance Industries चा आहे यामध्ये आपण वर पाहिलेल्या Strategy च्या अटी पूर्ण होत आहेत


2. हा चार्ट मंगळ, 23 जुलै 2024, HDFC Life Insurance चा आहे यामध्ये आपण वर पाहिलेल्या Strategy च्या अटी पूर्ण होत आहेत.
अशी अनेक उदाहरणे तुम्ही शेअरचे चार्ट उघडून पाहू शकता. कुठल्याही शेअर मध्ये ही Strategy वापरण्यापूर्वी मागील इतिहास पहावा, त्यानंतर ही Strategy किती काम करते हे ठरवून
निष्कर्ष
BTST Startegy ही पद्दत शेअर्स खरेदी-विक्री ची नामांकित पद्दत आहे. या स्ट्रॅटेजी बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिली त्यामध्ये ती स्ट्रॅटेजी काय आहे, स्ट्रॅटेजी चे नियम काय आहेत आणि या स्ट्रॅटेजी मध्ये काम करताना शेअर्सची निवड कशी करावी याबद्दल सर्व माहिती घेतली आहे. या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही जेवढं जास्त भांडवल लावता त्याच पटीत तुम्हाला नफा किंवा तोटा होणार आहे, त्यामुळे असा सौदा करताना आपण किती रुपये कमवण्यासाठी किती रुपये गमवायला तयार आहोत हे माहीत असलं पाहिजे.
अस्वीकरण:
हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेले आहेत, आम्ही गुंतवणूकदारांना कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला देतो.