Best Mutual Fund: आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड चे ए यू एम म्हणजे एसेट अंडर मॅनेजमेंट 59,495 करोड रुपये झाले आहे. मल्टी एसेट फंड विभागात AUM चा 48% हिस्सा एकट्या आय.सी.आय.सी.आय पृडेन्सीअल मल्टी एसेट फंड कडे आहे.

Best Mutual Fund: म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करुन करोडपती बनायचं असेल, तर हा म्युच्युअल फंड प्रकार नक्कीच तुम्हाला करोडपती बनवू शकतो. म्युच्युअल फंड च्या मल्टी एसेट फंड या प्रकारच्या म्युच्युअल फंडातून तुम्हाला इतर बेंचमार्क किंवा म्युच्युअल फंड पेक्षा जास्त परतावा मिळतो. भारत देशातील सर्वात मोठया मल्टी एसेट फंड म्हणजे आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड मध्ये इथून मागे बावीस वर्षांपूर्वी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आज 7 कोटी 26 लाख रुपयांचा परतावा मिळवला आहे. अर्थलाभ या वेबसाईटच्या एकत्रित आकड्यांनुसार याच बावीस वर्षात निफ्टी-200 या बेंचमार्क इंडेक्स मध्ये 10 लाख गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना फक्त 3 कोटी 36 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे, म्हणजे मल्टी एसेट फंडने इंडेक्स पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
Best Mutual Fund:आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड ने दिलेला परतावा
आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड चा एसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM 59,495 कोटी रुपये झाला आहे. याचा अर्थ असा आहे की, मल्टी एसेट फंड विभागात हा फंड 48% चा हिस्सा स्वतः कडे ठेवून सर्वात मोठा फंड बनला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंडवर चांगला विश्वास ठेवला आहे. आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड या फंडमध्ये 31 ऑक्टोबर 2002, 10 लाख रुपये गुंतवणूक केलेली होती त्याचा यावर्षी 30 सप्टेंबर पर्यंत वार्षिक 21.58% च्या चक्रवाढीने परतावा दिला आहे. हेच आकडे निफ्टी-200 इंडेक्स बरोबर विचार केला तर इंडेक्स ने वार्षिक फक्त 17% चा परतावा दिला आहे.
हा म्युच्युअल फंड एसआयपी पेक्षा फायदेशीर ठरला
या फंडात एस आय पी च्या माध्यमातून दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवणूक केली असती तरी त्याचे फक्त 3 करोड रुपये झाला आहे. त्याच बरोबर जी मुख्य गुंतवणूक झाली आहे, ती फक्त 26.5 लाख झाली आहे. म्हणजे याची आकडेवारी पाहिली तर ती सिएजीआर परतावा 18.35% झाला आणि तोच परतावा इंडेक्स मध्ये सिएजीआर फक्त 14.5% च्या हिशोबाने राहिला आहे.
जास्त कालावधी साठी गुंतवणूक फायदेशीर
आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड या कंपनीचे मुख्य व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांनी सांगितले की, आमच्याकडे आलेल्या पैशाची व्यवस्था आम्ही वेगवेगळ्या आर्थिक उत्पादनामध्ये करतो त्यामुळे म्युच्युअल फंड चांगला परतावा देत आहे. आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड च्या फंड व्यवस्थापकावर आम्ही विश्वास ठेवतो त्यामुळे ते व्यवस्थापक या फंडद्वारे मिळालेला फंड शेअर, कमोडिटी आणि डेट या सर्व विभागात गुंतवणूक करतात.
10 वर्षात आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड चांगला परतावा
या फंड चे मुख्य फंड मॅनेजर एस नरेन यांनी सांगितले की, मागील दहा वर्षांत आणि अलीकडच्या काळात वेगवेगवेगळ्या एसेट विभागानी दाखवले आहे की, चांगलं प्रदर्शन करणारा शेअर सुद्धा दिवसें दिवस कमी जास्त होत असतो. त्यामुळे आपल्या गुंतवणूकिला वेगवेगळ्या एसेट मध्ये फिरवणे चांगल्या परताव्यासाठी महत्त्वाचे असते. असे करत असल्याने तुमची गुंतवणूक शेअर बाजारात जोखमीच्या अधीन राहत नाही आणि परताव्यात सुद्धा सातत्य टिकून राहते. आयसीआयसीआय पृडेंशिअल एसेट फंड हा या सर्व प्रकारच उत्तम उदाहरण म्हणून सिद्ध झाला आहे कारण बाजार कमी जास्त होत असला तरी या मल्टी एसेट फंड ने चांगला परतावा दर्शवला आहे.
Disclaimer: शेअर मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी-विक्री करण्यासाठी भांडवल.Com सल्ला देत नाही. आम्ही शेअर मार्केट संबधीत सर्व विश्लेषण हे कंपनी आणि बाजार विश्लेषक यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाशित करत असतो, म्हणून शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी शासनमान्य विश्लेषकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.
अधिक जाणून घ्या: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते?
अधिक जाणून घ्या: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?