परिचय
शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्री करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे अकाऊंट म्हणजे डिमॅट अकाऊंट. Demat meaning in marathi अकाऊंट शिवाय आपण शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग भांडवली साधनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. चला तर मग डिमॅट अकाऊंट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
Table of Contents
डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
डिमॅट अकाऊंट हा “डिमॅटेरियलाइज्ड अकाऊंट”चा शॉर्ट फॉर्म आहे. हा एक प्रकारचं अकाऊंट आहे, Demat Meaning in Marathi ज्याद्वारे तुम्ही तुमचे शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड यासारख्या मालमत्ता इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल स्वरूपात साठवू शकता. पूर्वीच्या काळी या सर्व सर्व मालमत्तांचे प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट्स) कागदावर असायचे, परंतु 1996 मध्ये डिमॅट या स्वरूपात अकाऊंट उघडणे शक्य झाले आणि गुंतवणूक किंवा शेअर्सचे कागद न ठेवता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणे शक्य झाले आहे.
डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे?
र्वीच्या काळी डिमॅट ही संकल्पना नव्हती, कारण तंत्रज्ञान किंवा डिजिटल माध्यम उपलब्ध नव्हते त्यामुळेच भांडवली बाजारात किंवा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणं ही डोके दुःखी वाटायची. पण आज सर्व तंत्रज्ञान व डिजिटल माध्यम तयार झाली आहे आणि त्यांचा वापर करून आपण डिमॅट अगदी थोड्या वेळेत घर बसल्या आपल्या मोबाईल वरून सुद्धा डिमॅट अकाऊंट उघडू शकतो. डिमॅट Demat Meaning in Marathi खाते कसे उघडायचे याची सविस्तर प्रक्रिया जाणून घेऊया;

- शेअर ब्रोकर निवड: शेअर ब्रोकर (Share Broker) एक व्यक्ती किंवा संस्था असते जी शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या वतीने शेअर्स खरेदी आणि विक्रीची सुविधा पुरवते. हे लोक किंवा कंपन्या शेअर बाजारातील व्यवहारांची पूर्तता करतात आणि त्यासाठी ठराविक कमिशन किंवा शुल्क आकारतात. शेअर ब्रोकर निवडताना सेबी (SEBI) नोंदणीकृत किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) आहे की नाही हे तपासाव लागेल. शेअर ब्रोकर निवडताना, त्यांचा अनुभव, सेवांचे प्रकार, शुल्क आणि ग्राहक सेवा यांचा विचार करणे महत्त्वाचे असते.सर्वात चांगला शेअर ब्रोकर कोण आहेत ते आपण सविस्तर दुसऱ्या पानावर पाहू.
- डिमॅट अर्ज भरणे: तुम्हाला ब्रोकरकडे अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि बँक खाते तपशील जमा करावे लागतील.हे तपशील जमा करताना एक काळजी घ्या, जे तपशील देत आहोत ते अचूक, आणि चालू असलेले द्या. त्यामुळे तुमची डिमॅट अकाऊंट ओपनिंग ची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
- केवायसी (KYC) प्रक्रिया: डिजीटल प्रकियेद्वारे अर्ज केल्यानंतर तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया करावी लागते ती पूर्ण करून घ्या.
- अकाऊंट उघडणे: ब्रोकर निवड, अर्ज करणे, के.वाय.सी. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक डिमॅट अकाऊंट नंबर मिळेल, त्याबरोबर अप्लिकेशन उघडण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही ब्रोकरच्या अप्लिकेशनद्वारे शेअर्स खरेदी-विक्री किंवा गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करू शकता. डीमॅट मध्ये तुम्ही केलेल्या खरेदी विक्री चा तपशील दिसतो.
डिमॅट खाते उघडण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्रे? | Demat Meaning in Marathi
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते महत्वाची भूमिका बजावते. डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे आहेत;
- पॅनकार्ड
- आधारकार्ड
- बँक रद्द केला चेक
- सॅलरी स्लिप
- पासपोर्ट साइज फोटो
डिमॅट अकाऊंट चे फायदे?
1. सुरक्षितता: आजच्या डिजिटल युगात तुम्हाला कागदपत्रांच्या गहाळ होण्याची काळजी किंवा फसवणुकीची शक्यता कमी होते.
2. सुलभ व्यवहार: डिमॅट अकाऊंट हे डिजिटल स्वरूपात असल्याने शेअर्स खरेदी व विक्री जलद आणि सोपी होते.
3. ऑनलाईन प्रवेश:डिमॅट खाते अप्लिकेशन किंवा डिजिटल च्या मदतीने ऑनलाइन व्यवस्थापित करू शकता.
4. कमी खर्च: सर्व प्रकिया डिजिटल असल्याने कागदी प्रमाणपत्रे व्यवस्थापित करण्यासाठी लागणारा खर्च कमी होतो.
डिमॅट खाते बंद कसे करावे?
डिमॅट अकाऊंट द्वारे आपण शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करत असतो. पण काही कारणास्तव तुम्हांला डिमॅट अकाऊंट बंद करायचे असेल तर आपण खालील प्रक्रिया करून डिमॅट Demat Meaning in Marathi खाते बंद करू शकतो.
1. डिमॅट अकाउंट क्लोजर फॉर्म भरणे: तुम्हाला तुमच्या शेयर ब्रोकर किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) कडून एक डिमॅट खाते बंद करण्याचा फॉर्म मिळेल. तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन किंवा ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन भरू शकता.
2. फॉर्म सबमिट करणे: फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती जसे डिमॅट खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, नंबर आणि इतर संबंधित माहिती भरून, तो आपल्या शेअर ब्रोकर किंवा DP कडे जमा करा. फॉर्ममध्ये खाते क्रमांक, खातेदाराचे नाव आणि इतर संबंधित माहिती बरोबर असल्याची खात्री करावी लागते.
3. होल्डिंग ट्रांसफर किंवा विक्री: डिमॅट खाते बंद करण्यासाठी तुम्हांला तुमच्या खात्यात असलेले शेअर्स किंवा इतर सिक्युरिटीज असतील, तर ते दुसऱ्या खात्यात ट्रांसफर किंवा मार्केट मध्ये विक्री करणे आवश्यक आहे. डिमॅट खात्यातील सर्व व्यवहारात पूर्ण झाल्यावर आपण डिमॅट खाते बंद करू शकतो.
4. सर्व शुल्क भरणे: डिमॅट अकाऊंट बंद करण्याच्या प्रक्रियेपूर्वी आपल्या खात्यात काही प्रलंबित शुल्क असतील तर ते पूर्ण भरावे लागतात, मगच खाते बंद करण्याची प्रक्रिया करू शकतो.
5. कागदपत्रे आणि गुंतवणूक काढणे: खाते बंद करताना तुमच्या डिमॅट खात्यातील सर्व कागदपत्रे, होल्डिंग आणि इतर इन्व्हेस्टमेंटचे सर्व व्यवहारात पूर्ण झाले आहेत का याचे निवारण करा. जर तुमच्याकडे कोणतीही डीआरएफ (Demat Request Form) किंवा काही प्रलंबित ऑनलाइन प्रक्रिया असतील, तर त्याचे काम पूर्ण करा.
6. डिमॅट खाते बंद कन्फर्मेशन: डिमॅट अकाऊंट बंदची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेअर ब्रोकर (Share Broker) किंवा डिपोझीटरी पार्टीसिपंट कडून तुम्हाला तुमचे खाते बंद केल्याचे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर, तुमचे डिमॅट खाते बंद झाले आहे याची खात्री होते.
आशा सुलभ प्रक्रिया करून तुम्ही तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट बंद करू शकता.
डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय फरक आहे?
डिमॅट अकाऊंट हे तुम्हाला तुमची गुंतवणूक डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवण्याचा अधिकार देते, तर ट्रेडिंग अकाऊंट चा वापर करून शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्री चा व्यवहार करू शकतो.
डिमॅट अकाऊंटमुळे आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवता येते, कुठल्याही प्रकाची चोरी होण्याची जोखीम राहत नाही तर ट्रेडिंग अकाऊंट मुळे आपण ती सुरक्षित गुंतवणूक खरेदी करून डिमॅट मध्ये घेऊ शकतो.
ट्रेडिंग अकाऊंट मधून आपण देशातील सर्व स्टॉक एक्सचेंज वर खरेदी विक्री करू शकतो. डिमॅट अकाऊंट हे डिजिटल स्वरूपात असल्याने कुठल्याही प्रकारचे शेअर खरेदी-विक्री किंवा गुंतवणूकीचे कागदपत्रे सांभाळून ठेवायची आवश्यकता राहत नाही.
डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट हे दोन्हीही खात्यामध्ये फरक आहे, परंतु शेअर मार्केट मध्ये व्यवहार किंवा गुंतवणूक करण्यासाठी महत्वाचे आहेत.
निष्कर्ष:
डिमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंट बद्दल, डिमॅट म्हणजे काय, डिमॅट कसे ओपन करावे, डिमॅट कसे बंद करावे, महत्वाचे कागदपत्रे अशी (Demat Meaning in Marathi) संपूर्ण माहिती आपण या लेखात पहिली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा, यामुळे भांडवल टीम चा उत्साह वाढण्यास मदत होईल.