ELSS Mutual Fund in Marathi: ईएलएसएस म्युच्युअल फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंड आहे, जो टॅक्स वाचवून मोठ्या कालावधीत चांगला परतावा देण्यासाठी प्रचलित आहे. ईएलएसएस इक्विटी म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्ही 1,50,000 पर्यंत च्या परताव्यावर आयकर अधिनियम 1961 च्या धारा 80C च्या माध्यमातून कर बचत करू शकता. या अधिनियमाद्वारे झालेल्या कर बचतीमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
Table of Contents

ईएलएसएस म्युच्युअल फंड चे मुख्य फायदे | ELSS Mutual Fund in Marathi
१. कर बचत: तुम्ही गुंतवणूक केलेल्या 1.5 लाखापर्यंत च्या गुंतवणूक वर तुम्हाला सरकारला कर भरावा लागत हा मुख्य फायदा आहे.
२. लॉक-इन कालावधी: ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेलं भांडवल कमीत कमी तीन वर्षांसाठी लॉक केलेले असते, म्हणजे तीन वर्षे आपण चांगल्या परताव्याची वाट पाहू शकतो.
३. जास्तीतजास्त परतावा: ईएलएसएस म्युच्युअल फंड हा इतर म्युच्युअल फंड सुविधापेक्षा जास्त आणि चांगला परतावा देण्यासाठी ओळखला जातो.
४. एक्सपेंस रेशो: ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये जो लागत प्रबंध किंवा एक्सपेंस रेशो असतो तो सर्वात कमी असतो त्यामुळे परतावा वाढण्यास मदत होते.
५. जोखीम आणि परतावा: ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला जोखीम आणि परतावा याचे गुणोत्तर चांगले साधता येते.
६. कमी ब्लॉकिंग कालावधी: इतर म्युच्युअल फंड सुविधांच्या तुलनेत तुम्हाला कमी लॉक इन कालावधी सहन करावा लागतो, हा एक मुख्य फायदा तुम्हाला मिळतो.
ईएलएसएस म्युच्युअल फंड चे मुख्य तोटे
ईएलएसएस म्युच्युअल फंड ज्याप्रमाणे फायदा मिळवून देतात त्याप्रमाणे त्याचे काही तोटे ही तुम्हाला सहन करावे लागतात.
१. लॉक-इन कालावधी: ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले भांडवल तीन वर्षांसाठी ब्लॉक होते त्यामुळे तुम्ही ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तीन वर्षे पैसे काढू शकत नाही.
२. लवचिकता कमी मिळते: ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुणवलेलं भांडवल तुम्हाला हवे असेल तरीही ते काढू शकत नाही.
ईएलएसएस म्युच्युअल फंड कसा निवडावा
रोलिंग रिटर्न तुम्हाला तुमच्या गुंतवणूक केलेल्या भांडवलावर किती परतावा मिळत आहे ते तपासून पाहण्यास मदत करते.
२. लार्ज कॅपिटल सुरक्षितता
ईएलएसएस म्युच्युअल फंड चे मार्केट कॅप मोठे असल्याने तुमच्या भांडवलाची सुरक्षितता टिकून राहते. भांडवल जास्त असल्यामुळे मॅनेजमेंट करण्यासाठी एक वेगळा फंड मॅनेजर असतो जो तुमची गुंतवणूक मॅनेज करून सुरक्षित परतावा देण्यासाठी प्रयत्न करत असतात.
३. कमी एक्सपेंस रेशो
ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना जो खर्च लागतो त्याला एक्सपेंस रेशो असे म्हणतात, आणि ईएलएसएस म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना इतर म्युच्युअल फंड पेक्षा कमी एक्सपेंस रेशो म्हणजे कमी खर्च लागतो. गुंतवणूक करताना खर्च कमी लागतो, त्यामुळे पुढे तुम्हाला परतावा जास्त मिळतो.
४. एएमसी कम्पनी स्थिती
एएमसी म्हणजे एसेट मॅनेजमेंट कंपनी जी तुम्ही गुंतवणूक केलेल्या भांडवलाच मॅनेजमेंट करते. गुंतवणूक करताना आशा कम्पणीच्या परताव्याची आणि कंपनी स्थिर आहे का याची चौकशी करणे गरजेचे आहे.
2025 मध्ये जबरदस्त परतावा देणारे ईएलएसएस म्युच्युअल फंड
1. Mirae Asset ELSS Tax Saver Fund
Mirae Asset ELSS Tax Saver Fund चा एक्सपेंस रेशो कमी आहे. गेल्या काही वर्षांत Mirae Asset ELSS Tax Saver Fund ने चांगला स्थिर परतावा दिला आहे. मार्केट कॅपिटल, थीम आणि गुंतवणूक शैली मध्ये लवचिकता मिळते. Mirae Asset ELSS Tax Saver Fund मध्ये जास्त कालावधी साठी गुंतवणूक फायदेशीर आहे. वाजवी किमतीत वाढीव कम्पणीच्या पोर्टफोलिओ मध्ये गुंतवणूक करता येते.आशा महत्त्वाच्या कारणांमुळे आणि Mirae Asset ELSS Tax Saver Fund ने गुंतवणूकदारांना कर बचत मध्ये नियमित फायदा मिळवून दिला आहे.
2. Kotak ELSS Tax Saver
Kotak ELSS Tax Saver फंड मध्ये गुंतवणूक फायदेशीर राहील करण Kotak ELSS Tax Saver फंड कंपनी स्थिती स्थिर आहे आणि रेकॉर्ड सुध्दा चांगलं आहे. कोटक फंड मध्ये सुद्धा गुंतवणूक केल्यापासून पुढे तीन वर्षांचा लॉक इन कालावधी आहे.
3. Parag Parikh ELSS Tax Saver Fund
Parag Parikh ELSS Tax Saver Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी खर्च जास्त लागतो कारण एक्सपेंस रेशो जास्त आहे. पराग पारीख ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाचे भांडवल हे 80% भारतीय इक्विटी मार्केट मध्ये गुंतवले जाते.
ईएलएसएस म्युच्युअल फंड कोणी करावी?
नवीन गुंतवणूकदार, सामान्य जनता किंवा नोकरी करणारे नोकरदार या सर्वांना हे म्युच्युअल फंड चांगला परतावा आणि कर बचतीचा पर्याय उपलब्ध करून देत आहेत.
निष्कर्ष
2025 मध्ये ईएलएसएस म्युच्युअल फंड हे कर बचत आणि स्वतंत्र चांगला परतावा मिळवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे ईएलएसएस म्युच्युअल फंड या विभागात कर बचत करणारे म्युच्युअल फंड सामान्य गुंतवणूक दारांसाठी फायदेशीर आहेत. भविष्यातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कर बचत करून चांगला परतावा मिळवण्यासाठी ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक नक्की करावी असे आम्हाला वाटते.
Disclaimer: शेअर मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी-विक्री करण्यासाठी भांडवल.Com सल्ला देत नाही. आम्ही शेअर मार्केट संबधीत सर्व विश्लेषण हे कंपनी आणि बाजार विश्लेषक यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाशित करत असतो, म्हणून शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी शासनमान्य विश्लेषकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.
अधिक जाणून घ्या: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते?
अधिक जाणून घ्या: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?
अधिक जाणून घ्या: 10 रुपयांचा शेअर देतोय 25 रुपयांचा डिव्हिडंड, रेकॉर्ड तारीख आणि तिमाहीचे निकाल पहा.