HDB Financial IPO: HDFC बँकेची सहाय्यक कंपनी HDB Financial Services ने भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (SEBI) जवळ आपला प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) 12,500 कोटिंसाठी चा प्रस्ताव दिला आहे. HDB Financial IPO हा नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेल म्हणजे OFS असा नियोजित असणार आहे. हा HDFC बँक च्या सहाय्यक कंपणीचा IPO असल्याने खूप चर्चेत आहे, पण ह्या आय पी ओ साठी अर्ज करण्या अगोदर तुम्हाला ह्या 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे नाहीतर पुढे पश्चाताप करायची वेळ येऊ शकतो.

HDB Financial Services या NBFC च्या सेवा काय आहेत?
HDB Financial IPO Services ही HDFC बॅंकेची सहाय्यक कंपनी भारतीय बाजारपेठत आर्थिक सहाय्य व आर्थिक उत्पादने आशा सेवा सुविधा पुरवते. उदा. लोन – वयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि आपल्या सम्पत्ती वर सुद्धा कर्ज देते त्यामुळे ग्राहकांना सर्व आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत होते.
HDFC बँक ची सहायक
HDB Financial Services ही कंपनी HDFC बँक ची सहाय्यक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे, जी HDFC Bank म्हणजे भारतीय बाजारात सर्वात मोठी कर्ज दाता बँकेच्या नियमानुसार काम करते. त्यामुळे HDB Financial Services जवळ मजबूत अर्थ सहाय्य आणि मोठया बँकेचा हात पाठीमागे असल्याने कंपनी ची स्थिती भक्कम आहे.
इश्यू आकार
हा इश्यू एकूण ₹12,500 कोटींच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये ₹2,500 कोटींच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि HDFC बँक लिमिटेडद्वारे ₹10,000 कोटींपर्यंतच्या शेअर्स ची विक्रीची ऑफर (OFS) समाविष्ट आहे, ज्याला “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर” म्हणून संबोधले जाते. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य ₹10 आहे.
इश्यू कशासाठी
HDB Financial Services या NBFC ने नवीन इश्यूसमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर कंपनीचा टियर – I भांडवल आधार मजबूत करण्यासाठी आणि व्यवसायाच्या विस्तारामुळे होणाऱ्या कर्जाशी संबंधित भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे.
इश्यू चा प्रकार: फ्रेश इश्य व OFS
हा IPO एक फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल म्हणजे (OFS) चं नियोजन आहे. फ्रेश इश्यू मध्ये HDB Financial Services चा 2,500 करोड रुपयांचा हिस्सा आहे, आणि HDFC बँक प्रोमोटर्स चा हिस्सा OFS द्वारे 10,000 करोड रुपये उभा करनार आहे. HDB Financial Services ही HDFC बॅंक ची साह्ययक असल्याने कम्पनी मध्ये HDFC Bank ची हिस्सेदारी 94.36% आहे.
आरबीआई च्या नियमाप्रमाणे सुचिबद्ध
HDB Financial Services च्या सुचिबद्ध होण्याचा निर्णय हा भारतीय रिजर्व बैंक (RBI) च्या ऑक्टोबर, 2022 च्या निर्णयानुसार आलेला आहे. ज्यामध्ये भारतीय रिजर्व बैंक (RBI) ने ‘अप्पर लेअर’ मध्ये येणाऱ्या NBFC ला तीन वर्षांच्या आतमध्ये स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध करण्याचे आदेश दिले होते. या इश्यू किंवा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) नंतर सुद्धा कम्पनी HDFC Bank ची सहाय्यक राहील आणि त्यांच्या नियमानुसार कार्य करणार आहे.
फायनान्सियल मूल्यांकन
HDFC बँक, HDB Financial Services साठी 78,000 ते 87,000 करोड रुपयांचं फायनॅन्सीयल मूल्यांकन मागत आहे. हे मूल्यांकन कंपनीच्या प्राइस-टू-बुक वैल्यू च्या 4.5 ते 5 पट असल्याचे दर्शवत आहे, त्यामुळे या IPO कडे गुंतवणूकदार आकर्षित होण्याची शक्यता जास्त आहे.
HDB Financial IPO|अर्थिक प्रदर्शन
आर्थिक वर्ष 2023 (FY23) मध्ये कंपनीच्या कर्जाच्या पोर्टफोलिओ मध्ये 17% ची वार्षिक वाढ झालेली आहे, ज्यामुळे हा पोर्टफोलिओ 66,000 करोड रुपयांवर जाऊन पोहचला आहे. याच मुख्य कारण म्हणजे वयक्तिक, वाहन आणि लहान व्यवसाय यांच्याकडून आलेली कर्जाची मागणी आहे. आर्थिक वर्ष 2023-24 (FY23-24) मध्ये कम्पणीच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन ते 14,171 करोड रुपये झालं आहे जे मागील वर्षात 12,402 करोड रुपये होते. त्याचबरोबरआर्थिक वर्ष 2024 मध्ये कम्पनी चा फक्त एकूण नफा 2,460 करोड रुपये झाला, तोच नफा आर्थिक वर्ष 2023 मध्ये फक्त 1,959 करोड रुपये होता.
बुक-रनिंग लीड मॅनेजमेंट
HDB Financial IPO साठी मुख्य बुक-रनिंग लीड मॅनेजर मध्ये JM Financial, BNP Paribas, Bofa Securities India, Goldman Sachs (India) Securities, HSBC Securities आणि Capital Markets (India) Pvt Ltd यांच्या मार्फत केलं जाणार आहे.
कंपनी ची एकुण संपत्ती | HDB Financial IPO Net Worth
आर्थिक वर्ष 2024 च्या जून महिन्याच्या तिमाही पर्यंत HDB Financial Services कंपनीची एकूण संपत्ती 13,300 करोड रुपये होती, त्यामुळे अशी आर्थिक स्थिती ही कंपनी ची बाजू भक्कम असल्याचे दाखवते.अशा कम्पणीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) साठी अर्ज करण्याचा किंवा बोली लावण्यासाठी प्रयत्न करावा.
निष्कर्ष
HDB Financial Services चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी निर्माण करून देत आहे. कारण HDFC Bank सारख्या भक्कम पाय रोवून उभा असलेल्या कंपनी च्या नियोजना खाली चालणारी कम्पनी आहे आणि कंपनी ची अर्थिक बाजूही मजबूत आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कम्पनी च्या यादीमध्ये HDB Financial Services ही NBFC उच्च स्तरावर आहे म्हणून या IPO मधून गुंतवणूक दारांना चांगला परतावा मिळवण्याची साधी मिळु शकते.
अधिक जाणून घ्या: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?
अधिक जाणून घ्या: तुमच्या कर्जावर परिणाम करणारे घटक
अधिक जाणून घ्या: डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? आणि डिमॅट अकाऊंट कसे ओपन करावे?