परिचय
IPO Meaning in Marathi म्हणजे कंपनी खासगी असल्यापासून सार्वजनिक कंपनी बनण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा एखादी कंपनी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरींग (IPO) आणल्यानंतर, ती कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होते. नोंदणीकृत झाल्यानंतर तिचे शेअर्स सेकंडरी म्हणजे खुले बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. IPO च्या माध्यमातून उभारलेले पैसे कंपनी तिच्या विस्तार, विकास, किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरू शकते.
Table of Contents

प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) म्हणजे काय?
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO Meaning in Marathi) म्हणजे एखाद्या कंपनीकडून प्रथमच शेअर्स विक्रीसाठी सार्वजनिकपणे ऑफर केले जातात. या प्रक्रियेत, कंपनी आपले काही शेअर्स सामान्य लोक, गुंतवणूकदार, किंवा संस्थांना विकते, ज्यामुळे कंपनीला पुढच्या कामांसाठी भांडवल उभारण्यास मदत होते.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) ची प्रक्रिया कशी असते?
आज तंत्रज्ञान विकसित असल्याने ही सर्व प्रकिया डिजिटल स्वरूपात होत आहे. IPO च्या प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश असतो:
1. अंडररायटर्सची निवड:
कंपनी बँक किंवा वित्तीय संस्थांना नियुक्त करते, जे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) ची योजना तयार करण्यात आणि त्याची पूर्ण अंमलबजावणीत मदत करतात.
2. अर्ज आणि मंजुरी:
कंपनीला प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) साठी अर्ज करून नियमांकडून मंजुरी मिळवावी लागते.
3. शेअरची किंमत निश्चित करणे:
शेअरची प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) प्रारंभिक किंमत ठरवली जाते, जी गुंतवणूकदारांना विक्रीसाठी ऑफर केली जाईल.
4. शेअर बाजारात लिस्टिंग:
प्राथमिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) नंतर कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होतात.
प्राथमिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) ही कंपनीसाठी भांडवल उभारण्याची मोठी संधी असते, परंतु त्याचबरोबर काही जोखमीही असतात.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) चे प्रकार?
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) चे मुख्यतः तीन प्रकार असतात, जे कंपनीच्या धोरणानुसार आणि गुंतवणूकदारांच्या सहभागानुसार ठरवले जातात. प्राथमिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) चे प्रकार खालीलप्रमाणे आहेत;
1. फिक्स्ड प्राइस इश्यू (Fixed Price Issue)
फिक्स्ड प्राइस इश्यू या प्रकारात, कंपनी शेअरची निश्चित किंमत आधीच ठरवते आणि ती गुंतवणूकदारांना ऑफर केली जाते. गुंतवणूकदार या निश्चित किमतीवर शेअर्सची खरेदी करू शकतात. एकदा IPO बंद झाल्यानंतर शेअर बाजारात या शेअर्सची लिस्टिंग केली जाते.
वैशिष्ट्ये:
- गुंतवणूकदारांनी शेअर्ससाठी दिलेली मागणी सार्वजनिक केली जाते.
- गुंतवणूकदारांनी ठराविक किंमतीवर शेअर्स खरेदी करायचे असतात.
2. बुक बिल्डिंग इश्यू (Book Building Issue)
बुक बिल्डिंग इश्यू या प्रकारात, शेअरची अंतिम किंमत निश्चित केली जात नाही, परंतु एक किंमत पट्टा (Price Band) निश्चित केला जातो. गुंतवणूकदारांना त्या पट्ट्याच्या आतमध्ये किंमत निवडण्याचा पर्याय दिला जातो. कंपनी शेवटी मागणी आणि सहभागानुसार शेअरची अंतिम किंमत ठरवते.
वैशिष्ट्ये:
- किंमत पट्टा (उच्च व निम्न मर्यादा) ठरवला जातो.
- शेअरची अंतिम किंमत मागणी आणि पुरवठाच्या आधारावर ठरवली जाते.
3. ऑफर फॉर सेल (Offer for Sale – OFS)
ऑफर फॉर सेल प्रकारात कंपनीचे आता आहेत आता आहेत ते शेअरधारक, म्हणजे प्रमोटर्स (Promotors) किंवा इतर मोठे गुंतवणूकदार, त्यांच्या मालकीचे शेअर्स विकतात. कंपनी नव्या शेअर्सची निर्मिती करत नाही, फक्त जे आता आहेत ते शेअर्स विकले जातात.
वैशिष्ट्ये:
- ऑफर फॉर सेल मध्ये नव्या शेअर्सची निर्मिती होत नाही.
- आता ज्या भागदारकाकडे शेअर्स आहेत ते शेअरधारक आपले शेअर्स विकून नफा कमवतात.
हे IPO चे मुख्य प्रकार आहेत, आणि त्यांपैकी कोणता प्रकार निवडायचा, हे कंपनीच्या भांडवलाची गरज, मार्केटची स्थिती, आणि गुंतवणूकदारांचा प्रतिसाद यांवर ठरवले जाते.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) ची गरज काय आहे?
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) कंपनीसाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते कारण ते कम्पणीच्या अनेक गरजा आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करते. खाली IPO ची गरज आणि उद्देश स्पष्ट करणारे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत:
1. भांडवल उभारणे
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) हे कंपनीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्याचे मुख्य साधन आहे. कंपनीला नवीन प्रकल्प, विस्तार, संशोधन आणि विकास (R&D), किंवा कर्ज फेडण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीचे प्रोमोटोर्स आणि भागधारक आपले शेअर्स विकून कंपनी हे आवश्यक भांडवल उभारू शकते.
2. प्रसिद्धी आणि विश्वासार्हता वाढवणे
कंपनी शेअर बाजारात स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध झाल्यानंतर ती अधिक प्रसिद्ध आणि पारदर्शक बनते. यामुळे कंपनीची विश्वासार्हता वाढते आणि गुंतवणूकदार, ग्राहक आणि भागीदारांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतात.
3. गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा पर्याय
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) हा विद्यमान गुंतवणूकदारांसाठी (जसे की प्रमोटर्स, प्रारंभिक गुंतवणूकदार, आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट्स) आपली गुंतवणूक विकून नफा घेण्याचा एक मार्ग आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) नंतर त्यांच्या शेअर्सची बाजारात इतर किरकोळ किंवा संस्थांना शेअर्सची विक्री करता येते.
4. कर्जाचे ओझे कमी करणे
सुरवातीला कंपनी चालवण्यासाठी अनेक कंपन्या कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभे करतात, जे त्यांच्या आर्थिक ताळेबंदावर ताण टाकते. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) द्वारे उभारलेले भांडवल कर्ज फेडण्यासाठी वापरले जाऊ शकते, ज्यामुळे कंपनीचा आर्थिक ताण कमी होतो.
5. विस्तार आणि विकासाच्या संधी
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO Meaning in Marathi) कंपनीला त्यांच्या उत्पादन वाढविण्यासाठी किंवा सेवेच्या विस्तारासाठी, कारखाना सुरु करण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक भांडवल पुरवतो. यामुळे कंपनीला स्पर्धात्मक जगामध्ये आर्थिक स्थिती मजबूत करता येते.
6. मालकीहक्काचे वाटप
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) नंतर कंपनीतील मालकीहक्क विक्रीसाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध होतो. त्यामुळे कंपनीचे मूळ संस्थापक किंवा प्रमोटर्स यांना आपले काही मालकी हक्क विकून आर्थिक फायदा घेता येतो, तसेच कंपनीचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवता येते.
7. भविष्यातील निधी उभारणी सुलभ होणे
एकदा कंपनी शेअर बाजारात स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध झाल्यानंतर, भविष्यात अधिक शेअर्स विकून किंवा इतर वित्तीय साधनांचा वापर करून भांडवल उभा करणे सोपे होते. यामुळे कंपनीला भविष्यातील वाढीसाठी भांडवलाची कमतरता भासत नाही.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) कंपनीसाठी विकास आणि विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते आणि त्याचबरोबर आर्थिक स्थिती आणि प्रसिद्धीमध्ये देखील महत्त्वची भूमिका बजावते.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) चे तोटे काय आहेत?
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) घेणे फायदेशीर असले तरी, त्याबरोबर काही तोटे आणि जोखीमही आहेत. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) च्या प्रक्रियेमुळे कंपनीच्या व्यवस्थापनावर आणि गुंतवणूकदारांवर विशिष्ट दबाव येऊ शकतो.प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) काही मुख्य तोटे खाली IPO चे मुख्य तोटे दिले आहेत:
1. उच्च खर्च
IPO घेण्यासाठी प्रचंड खर्च येतो. यामध्ये नियामक शुल्क, वकील आणि लेखापालांची फी, मार्केटिंग खर्च, आणि अंडररायटर्सची फी यांचा समावेश होतो. हे खर्च कधीकधी खूप मोठे असू शकतात आणि यामुळे कंपनीला सुरुवातीला आर्थिक भार सहन करावा लागतो.
2. आर्थिक माहितीची पारदर्शकता
सार्वजनिक लिस्टिंगनंतर कंपनीला आपले आर्थिक व्यवहार, कमाई, खर्च, आणि इतर महत्त्वाची माहिती नियमितपणे सार्वजनिक करावी लागते. यामुळे व्यवसायातील गोपनीयता कमी होते आणि स्पर्धकांना कंपनीबद्दल अधिक माहिती मिळते. याशिवाय, वित्तीय माहिती सार्वजनिक केल्यानंतर गुंतवणूकदार आणि विश्लेषक कंपनीच्या निर्णयांवर बारीक लक्ष ठेवतात.
3. विस्तारित नियमांचे पालन
एकदा कंपनी सार्वजनिक झाल्यावर, तिला अनेक नियामक आणि कायदेशीर नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये आर्थिक अहवाल सादर करणे, शेअरधारकांसोबत पारदर्शकता राखणे, आणि विविध नियामक संस्थांच्या गरजा पूर्ण करणे यांचा समावेश असतो. हे सर्व व्यवस्थापित करणे वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते.
4. व्यवस्थापनावरचा दबाव
सार्वजनिक कंपनी बनल्यानंतर व्यवस्थापनावर कमी वेळेत झालेला नफा दाखवण्याचा दबाव येतो. शेअरधारक आणि विश्लेषक सतत कंपनीच्या कामगिरीकडे लक्ष देत असतात. यामुळे काही वेळा व्यवस्थापनाला दीर्घकालीन धोरणांपेक्षा तात्पुरत्या यशावर भर द्यावा लागतो, ज्यामुळे दीर्घकालीन विकासात अडथळे येऊ शकतात.
5. मालकी आणि नियंत्रणात घट
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO Meaning in Marathi) नंतर कंपनीचे शेअर्स सर्वसामान्य लोकांमध्ये विकले जातात, ज्यामुळे मूळ संस्थापक आणि प्रवर्तकांचा मालकी हक्क कमी होतो. यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनावर गुंतवणूकदारांचा अधिक दबाव येऊ शकतो, विशेषत: जेव्हा मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत घेतात.
6. शेअरच्या किमतीतील अस्थिरता
सार्वजनिक कंपनी झाल्यानंतर, कंपनीच्या शेअरच्या किमती बाजारातील स्थिती, गुंतवणूकदारांच्या भावना, आणि आर्थिक कामगिरीवर अवलंबून असतात. यामुळे शेअरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसते. जर शेअरची किंमत खूप खाली गेली, तर कंपनीची विश्वासार्हता आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
7. कर्ज घेण्याची क्षमता कमी होणे
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) द्वारे उभारलेल्या भांडवलामुळे कंपनीच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जर कंपनीने सार्वजनिकरित्या भांडवल उभे केले असेल, तर भविष्यात कर्ज घेणे कठीण होऊ शकते, कारण गुंतवणूकदारांच्या अपेक्षा आणि शेअर बाजारातील स्थिती या गोष्टींनी आर्थिक निर्णयांवर परिणाम होतो.
8. ताबा घेण्याची जोखीम
सार्वजनिक कंपनीच्या शेअर्स खुले बाजारात उपलब्ध असतात, त्यामुळे इतर कंपन्या किंवा गट विलीनीकरण किंवा अधिग्रहणाच्या उद्देशाने कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतात. यामुळे मूळ संस्थापकांच्या ताब्यातील नियंत्रण कमी होण्याची किंवा गमावण्याची शक्यता असते.
9. कायद्याचे जोखमी
सार्वजनिक कंपनी बनल्यानंतर, नियामक आणि कायदेशीर जबाबदाऱ्या वाढतात. काही वेळा शेअरधारक किंवा नियामक संस्थांकडून खटले किंवा चौकशी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे कंपनीला आर्थिक आणि प्रतिष्ठेची हानी होऊ शकते.
10. गोपनीयता कमी होणे
शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनीला तिचे व्यवसायिक रहस्ये आणि योजनांचे खुलासे करावे लागतात, ज्यामुळे स्पर्धकांना फायदा होऊ शकतो. यामुळे कंपनीला स्पर्धात्मक आघाडी गमावण्याचा धोका निर्माण होतो.
IPO हे मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्याचे आणि विकासाच्या संधी शोधण्याचे साधन आहे, पण त्यासोबत व्यवस्थापनाला उच्च जोखीम आणि नियामक दबावांचा सामना करावा लागतो.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) प्रक्रियातील महत्वाचे शब्दसंग्रह?
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग IPO साठी अर्ज करताना काही महत्वाचे शब्द आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतात. ते असे शब्द असतात जे आपण कधी कधी पहिल्यांदा ऐकत किंवा वाचत असतो, तर ते शब्द म्हणजे नक्की काय आहे. हे शब्द प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग IPO च्या प्रक्रियेत सतत येत असतात, या शब्दाचा अर्थ काय आहे हे समजून घेऊ:
- संक्षिप्त प्रॉस्पेक्टस (Abridged Prospectus) : ही कंपनीच्या प्रॉस्पेक्टसची एक संक्षिप्त आवृत्ती आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची की नाही हे ठरवण्यात मदत करण्यासाठी कंपनीबद्दल महत्त्वाची माहिती असते जसे की, उद्देश, सामग्री,आर्थिक डेटा, व्यवसाय मॉडेल आणि जोखीम मॉडेल, फायदे,आज्ञापत्र इ.
- बुक बिल्डिंग (Book building): मर्चंट बॅंक आणि लीड जारीकर्त्याद्वारे किंमत शोधण्यासाठीवापरली जाणारी यंत्रणा आहे.
- यंत्रणा आहे.
- अंडररायटर (Underwriter): बुक बिल्डिंग करण्याचं काम अंडररायटर करतो. यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदाराकडून उदभवणाऱ्या समस्या किंवा मागणीचे विश्लेषण करून बुक बिल्डिंग करतात.
- लिस्टिंग तारीख (Listing date): IPO Meaning in Marathi प्रक्रिया पूर्ण होत असताना कंपनीच्या शेअर्सची स्टॉक एक्सचेंज वर नोंदणी होण्याची तारीख ही लिस्टिंग तारीख असते.
- बीड लॉट (Bid lot) : बीड लॉट म्हणजे एक विशिष्ट प्रकारची लॉटरी पद्धत आहे, ज्यामध्ये व्यापार, व्यवसायांचे सार्वजनिक प्राथमिक ऑफरिंग मिळवण्यासाठी बोली (बीड) लावावी लागते. यामध्ये इच्छुक व्यक्ती किंवा कंपनीला ठराविक रक्कम भरून भाग घ्यावा लागतो आणि लॉटरीद्वारे विजेता ठरवला जातो.
- प्रमाणापेक्षा जास्त अर्ज (Oversubscription): ओव्हरसब्स्क्रिप्शन म्हणजे एखाद्या शेअर इश्यू किंवा कर्जाच्या निर्गमासाठी मागणी अपेक्षेपेक्षा जास्त होणे. म्हणजेच, जेव्हा एखाद्या कंपनीने आपल्या समभागांसाठी किंवा सिक्युरिटीजसाठी सार्वजनिक इश्यू काढला असतो, आणि त्याला भरण्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या उपलब्ध समभागांपेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला “ओव्हरसब्स्क्रिप्शन” म्हणतात.
- रेड हेरिंग प्रोस्पेक्टस (Red Herring Prospectus): रेड हेरिंग प्रोस्पेक्टस म्हणजे शेअर बाजारात एखाद्या कंपनीने सार्वजनिक इश्यू (IPO) आणण्यापूर्वी प्रकाशित केलेला प्राथमिक दस्तऐवज. हा एक प्रकारचा मसुदा असतो जो संभाव्य गुंतवणूकदारांना कंपनीबद्दलची प्राथमिक माहिती देतो. यामध्ये कंपनीचे आर्थिक विवरण, व्यवसाय मॉडेल, जोखीम घटक, उद्दिष्ट, आणि भांडवलाचा वापर यासारखी माहिती दिलेली असते.
- किमान किंमत (Floor price): फ्लोर प्राइस म्हणजे किमान किंमत, जी एखाद्या वस्तू किंवा सेवा विक्रीसाठी निश्चित केली जाते. शेअर बाजारात किंवा इतर लिलाव प्रक्रियेत, फ्लोर प्राइस म्हणजेच किमान किंमत, त्यापेक्षा कमी किंमतीवर व्यवहार होऊ शकत नाही. हे दर विशेषतः IPO (प्रारंभिक सार्वजनिक ऑफर) मध्ये किंवा शेअर्सचे लिलाव करताना निश्चित केले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या शेअरचा फ्लोर प्राइस ₹100 असेल तर त्यासाठी ₹100 किंवा त्यापेक्षा अधिक बोली लावावी लागते.
- सबस्क्रिप्सन (Subscription): सबस्क्रिप्शन म्हणजे एखादी सेवा, उत्पादन, किंवा वित्तीय साधन ठराविक कालावधीसाठी घेण्यासाठी केलेली नोंदणी किंवा सदस्यता. यामध्ये ग्राहक किंवा गुंतवणूकदार ठराविक शुल्क भरून सेवा किंवा उत्पादनाचा नियमित लाभ घेऊ शकतो. उदाहरणार्थ: शेअर बाजारात, जेव्हा एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स खरेदीसाठी अर्ज करतो, तेव्हा त्याला त्या IPO चे सबस्क्रिप्शन म्हणतात.
- प्राइसिंग (Pricing) प्राईसिंग म्हणजे एखाद्या उत्पादन, सेवा, किंवा मालमत्तेची किंमत ठरवण्याची प्रक्रिया. व्यापार, व्यवसाय किंवा अर्थशास्त्रात, प्राईसिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे कारण त्यावर ग्राहकांची मागणी, नफा, आणि बाजारातील स्पर्धा यांचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनाचे प्राईसिंग ठरवताना कंपनी त्याची किंमत जास्त ठेवू शकते जर त्याला बाजारात कमी स्पर्धा असेल, किंवा कमी ठेवू शकते जर ती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी गरजेची असेल.
- क्वाइट पिरियड व्याख्या (Quiet period definition)क्वाएट पिरियड म्हणजे एखाद्या कंपनीच्या IPO (प्रारंभिक सार्वजनिक इश्यू) प्रक्रियेतील एक कालावधी, ज्यात कंपनी आणि तिच्या अंतर्गत व्यक्तींना इश्यूबद्दल कोणतीही माहिती जाहीरपणे बोलण्यास किंवा प्रचार करण्यास मनाई असते. हे नियामक संस्थांकडून लागू केले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांवर योग्य माहिती मिळवून स्वतंत्र निर्णय घेण्याचा परिणाम होतो. साधारणतः हा कालावधी IPO फाइल केल्याच्या तारखेपासून सुरू होतो आणि शेअर्स बाजारात सूचीबद्ध होईपर्यंत चालू असतो.
- नोंदणी नसलेले शेअर्स (Unlisted shares)अनलिस्टेड शेअर्स म्हणजे असे शेअर्स जे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध नसतात. हे शेअर्स शेअर बाजारात थेट खरेदी-विक्री करता येत नाहीत, तर ते प्रायव्हेटली किंवा ओव्हर-द-काउंटर (OTC) पद्धतीने व्यापारासाठी उपलब्ध असतात. अनलिस्टेड शेअर्स प्रामुख्याने खाजगी कंपन्यांच्या किंवा स्टार्टअप्सच्या असतात, जे अजून सार्वजनिक लिस्टिंगसाठी पात्र नसतात किंवा लिस्ट होण्याची प्रक्रिया सुरू केली नसते. या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जोखमीचे प्रमाण जास्त असते, परंतु ते काही वेळा उच्च परतावा देखील देऊ शकतात.
- प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्ज (IPO application) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) मिळवण्यासाठी बीड ओपन झाल्यानंतर IPO Application करावे लागते त्यानंतर लॉटरी च्या माध्यमातून आपल्याला शेअर मिळतात.
- वाटप (Allotment) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर IPO ची वाटप होते. जे गुंतवणूकदार आणि सामान्य गुंतवणूक करणारे लोक पात्र झाले आहेत त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर टाकले जातात.
- अँकर इन्व्हेस्टर (Anchor investor)हे गुंतवणूकदार Initial Public Offering (IPO) मध्ये कंपनीचे शेअर्स इतर गुंतवणूकदारांपेक्षा आधी खरेदी करतात. त्यांचा उद्देश म्हणजे इतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणे आणि कंपनीच्या IPO ला स्थिरता देण्यासाठी असतात.अँकर गुंतवणूकदार साधारणतः मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार असतात, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भांडवल असते.
- इश्यू किंमत (Issue Price) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) प्रक्रिया करताना कंपनीला एक ठराविक किंमत अगोदरच ठरवावी लागत, त्यामध्ये खालची किंमत आणि वरची किंमत किती आहे ते निर्धारित करावे लागते.
- बुक रनिंग लीड मॅनेजर (Book Running Lead Manager) पुस्तक चालवणारे अग्रणी व्यवस्थापक असे म्हणतात. हे एक वित्तीय मध्यस्थ असतात जे सार्वजनिक समभागांची (IPO) प्रक्रिया व्यवस्थापित करतात. ते IPO Meaning in Marathi ची प्रक्रिया आणि IPO यशस्वी करण्यासाठी इतर गुंतवणूकदारांना सल्ला देणे, IPO ची किंमत निश्चित करणे, IPO चा प्रचार करणे आणि समभाग विक्री प्रक्रियेत सहाय्य करणे आशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतात.
- प्राइस बॅंड (Price band) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) एक ठरावीक किमतीचा पट्टा (Price Band) द्यावा लागतो त्या किमतीची आधारावर गुंतवणूक करण्यासाठी अर्ज मागवले जातात. किमतीचा पट्टा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) च्या प्रक्रिया मध्ये महत्वाची भूमिका बजावतो.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO Allotment) कसे तपासावे?
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग IPO Allotment चेक करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत;
पायरी 1- सर्वात आधी बी.एस.इ. (BSE) च्या वेबसाईटवर जायचं आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन जाऊ शकता:(https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx)
पायरी 2- लिंक उघडल्यावर दोन पर्याय दिसतात i.e. Equity or Debt यामध्ये Equity निवडा.
पायरी 3- वर दिलेल्या ड्रॉपडाऊन मेन्यु मधून (Issue Name) कंपनीचं नाव सिलेक्ट करा.
पायरी 4- पुढे तुमचा IPO अर्जाचा नंबर किंवा पॅनकार्ड नंबर टाकून शोधा तुमचा ऍलोटमेंट स्टेटस दिसेल.
या सोप्या पायऱ्या वापरून तुम्ही तुमच्या IPO Allotment ची स्थिती तपासून पाहू शकता.
महत्त्वाचे हे वाचा .!
- म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ?
- शेअर मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा?
निष्कर्ष
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO Meaning in Marathi) म्हणजे काय तर कंपनीकडून प्रथमच शेअर्स विक्रीसाठी सार्वजनिकपणे ऑफर केले जातात. या प्रक्रियेत, कंपनी आपले काही शेअर्स सामान्य लोक, गुंतवणूकदार, किंवा संस्थांना विकते, ज्यामुळे कंपनीला पुढच्या कामांसाठी भांडवल उभारण्यास मदत होते. त्याचबरोबर आयपीओ कुठं चेक करायचा, फायदे काय आहे, तोटे काय आहेत, आईपीओ ची गरज काय आहे या बद्द्ल संपुर्ण माहिती तुम्ही वाचली. भांडवल उभं करण्यासाठी कंपनीकडून हा पर्याय अवलंबला जातो.
अशीच सखोल माहिती आपण भांडवल या मराठी वेबसाईटवर वाचत राहा, पैसे गुंतवा आणि संपत्ती वाढवत चला.