दिवाळीची लगबग सुरू असतानाच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेडने आपल्या भागधारकांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत कंपनीने 2 मोठे निर्णय घेतले आहेत. श्रीराम फायनान्स लिमिटेडने शेअर विभाजन म्हणजे Shriram Finance Stock Split ची घोषणा केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने हा निर्णय घेतला यामुळे शेअरधारकांना चांगलाच फायदा होणार आहे.

श्रीराम फायनान्स 10 रु फेस व्हॅल्यू चा एक शेअर 3 रु फेस व्हॅल्यूच्या 5 शेअर्समध्ये स्प्लिट करण्यात येणार आहे. स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड तारखेची माहिती पुढच्या काही दिवसात दिली जाणार आहे. श्रीराम फायनान्सने 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत आणि आपल्या फाइलिंगमध्ये सांगितले की यासाठी भागधारकांकडून मंजुरी घेतली जानार आहे. आता श्रीराम फायनान्स लि. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. श्रीराम फायनान्सने स्टॉक एक्सचेंज वर सुचिबद्ध झाल्यापासून आतापर्यंत एकदाही स्टॉप स्प्लिट किंवा बोनस शेअर्स जारी केले नाहीत.श्रीराम फायनान्स लिमिटेड या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 22 रुपये अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर केला आहे.
बाठकिमध्ये अंतरिम लाभांशाची (Shriram Finance Stock Split, Interim Dividend Record Date) रेकॉर्ड तारीख 7 नोव्हेंबर 2024 ही फायनल केली आहे. त्याचबरोबर 24 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत जे भागधारक शेअर होल्डर आहेत, त्या भागधारकांना लाभांश दिला जाईल. याशिवाय कंपनीने 25 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल (Shriram Finance Results) जाहीर केले. श्रीराम फायनान्स लिमिटेडने टॅक्स नंतरच्या प्रॉफिटमध्ये 18.3 टक्के वाढ नोंदवली. कंपनीचे टॅक्स नंतरचे प्रॉफिट 2,071.26 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी या तिमाहीत हे प्रॉफिट 1,750.84 कोटी रुपये हाेते.कंपणीने सप्टेंबर तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न 16.37 टक्कयांनी वाढवून 5,606.74 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी हाच आकडा या कालावधीत 4,818.18 कोटी रुपये होता.श्रीराम फायनान्स लिमिटेडचा शेअर्स 25 ऑक्टोबर 2024 रोजी 4.69 टक्क्यांच्या घसरणीसह 3,092.65 रुपयांवर NSE वर बंद झाला.
या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 52 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या एका वर्षात शेअर्सने 70 टक्के परतावा देऊन भागधारकांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले आहे.