Share Market in Marathi: शेअर मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market in Marathi: आजच्या युगात, अनेक तरुण-तरूणी, नोकरी करणारे लोकं, रिटायर पुरुष-महिला शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसतं, कारण ते मोबाईलवर आशा काही ट्रेडर किंवा गुंतवणूकदाराची कथा ऐकतात, काही व्हिडीओ जाहिराती पाहतात. त्यामुळे या तरूणाई च्या मनात शेअर मार्केट शिकण्याची इच्छा, उत्सुकता निर्माण होते आणि हे सर्व तरुण-तरुणी व इतर नवशिखे लोकं अशा काही कोर्सेस, व्हिडीओ किंवा जाहिरातीला बळी पडतात आणि पैसे देऊनही शेअर मार्केट मध्ये लागणारी माहिती, कौशल्य मिळत नाही. कारण भारतीय स्टॉक मार्केट ची जागरुकता वाढत असताना अनेक स्टॉक ट्रेडर व गुंतवणूकदारांना त्यांचं झालेलं नुकसान भरपाई करण्यासाठी लागणारं ज्ञान नाही. म्हणून आपण भांडवल या वेबसाईटवर शेअर मार्केट म्हणजे काय ची परिपूर्ण माहिती व कौशल्य  मराठीमधून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नवीन शिकणारे, ज्ञान व शेअर मार्केट ची पुरेपुर माहिती नसल्यालेल्या काही ट्रेडर व गुंतवणूकदारांना वाटते की शेअर मार्केट म्हणजे एका रात्रीत श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे इतर अयशस्वी किंवा नवीनचं सुरुवात केलेले ट्रेडर व गुंतवणूकदार शेअर मार्केट मध्ये खूप नुकसान होते या भीतीने ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत नाही. या तीन गोष्टींचा विचार करता असे दिसते की, शेअर मार्केट किंवा गुंतवणूकीबद्दलच अपूर्ण ज्ञान, नुकसान होण्याची भीती आणि रात्रीत श्रीमंत होण्याचा लोभ यामुळे शेअर मार्केट शिकण्याचा व गुंतवणूक करण्याचा ताळमेळ होताना दिसत नाही.

तसं शेअर मार्केट हे चांगलंच आहे, इथं तुम्हाला तुमचे पैसे वाढविण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट मध्ये नुकसान व फायदा दोन्ही आहे, परंतु जे शिकतात, पूर्ण माहिती घेऊन ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी शेअर मार्केट हा संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग व उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केटची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे, या लेखात आपण शेअर मार्केट ची मूलभूत माहिती घेणार आहोत, चला तर मग आपली शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मराठी मधून शिकण्याची पहिली पायरी चढुयात.(Share Market in Marathi)

bhandval,
share market in marathi,
share market course in marathi,
stock market meaning in marathi

Share Market in Marathi|शेअर मार्केट म्हणजे काय? 

शेअर मार्केट बद्दल असलेली उत्सुकता व तुम्हाला शिकण्याची असलेली जबरदस्त इच्छाशक्ती यामुळे शेअर मार्केट म्हणजे नक्की काय आहे आणि शेअर मार्केट कसे काम करते यावर सखोल माहिती घेऊया.

अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर शेअर मार्केट ही एक मंडई आहे. ज्याप्रमाणे मंडई मध्ये फक्त भाजीपाल्याची खरेदी व विक्री होते. त्याचप्रमाणे शेअर मार्केट मध्येही अशीच स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन.एस.इ.(निफ्टी) व बी.एस.इ.(सेन्सेक्स) या इंडेक्स वर लिस्ट असलेल्या कंपणीच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री दिवसाच्या विशिष्ट वेळेत सार्वजनिकपणे होते. शेअर म्हणजे एखाद्या कंपनीचा समभाग, जेव्हा तुम्ही एक शेअर खरेदी करता, तेव्हा तुम्ही कंपनीचा एक समभाग म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअर्सच्या ठराविक किमतीची मालकी खरेदी करत असतात.(Share Market in Marathi)

उदाहरणार्थ, जर तुम्ही टाटा मोटर्स शेयर प्राईस या कंपनीचे प्रत्येक ₹९०० रुपये प्रमाणे १० शेअर्स खरेदी केले तर तुम्ही टाटा मोटर्स शेअर प्राइस चे शेअरहोल्डर होतात. हे १० शेअर्सची विक्री केव्हा व कोणत्या वेळी करायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. आज तुम्ही टाटा मोटर्स शेअर्सची खरेदी केली म्हणजे तुम्ही टाटा मोटर्स या कंपनी मध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक तुम्ही येणाऱ्या काळात शेअर ची किंमत वाढली तर ते १० शेअर्सची विक्री करून नफा कमवू शकता. (*टिप- हे फक्त उदाहरण म्हणून पाहत आहोत, कुठलीही खरेदी किंवा विक्री साठी सूचना नाही.)

शेअर मार्केट कसे काम करते?

शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे तुमच्या भविष्यातील गरजा म्हणजे तुमचं उच्च शिक्षण, कार, घर इ. सारख्या स्वप्नांना फायनान्स करून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होते. शेअरच्या किंमतीवर जगामध्ये व भारतात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम होतो. चांगल्या गोष्टी म्हणजे डेव्हलपमेंट होत असेल तर किंमती वाढू शकतात आणि युध्द किंवा काही आणीबाणी येत असेल तर किमती कमी होऊ शकतात. या गोष्टीचा परिणाम हा कमी कालावधीसाठी असतो, तुमची गुंतवणूक दीर्घकाळासाठी असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला फरक पडणार नाही.

अनेक तरुण-तरूणी, नोकरी करणारे लोकं किंवा रिटायर पुरुष-महिला ‘स्टॉक मार्केट’ व ‘शेअर मार्केट’ मध्ये संभ्रम निर्माण करतात. पण स्टॉक मार्केट व शेअर मार्केट या दोन्ही गोष्टी एकच आहेत. यामध्ये आपण फक्त शेअर्स ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगच नाही, तर इतर शेअर मार्केट मधल्या साधनांमध्ये जसे की कमोडिटी, बाँड्स, डेरिव्हेटिव्ह आणि फॉरेक्स सारख्या विविध मार्केट व फायनान्शियल सामग्री मध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी सक्षम बनवते.

शेअर मार्केट चे मुख्य  प्रकार?

शेअर मार्केट कसे चालते किंवा शेअर मार्केट म्हणजे काय हे वरवर आपण पाहिलं परंतु शेअर मार्केट मध्ये शेअर्स कसे येतात व त्यांच्या ट्रेडिंगला सुरुवात कशी होते हे या दोन प्रकारांमध्ये आपल्याला विस्तृत कळेल. (Share Market in Marathi)

शेअर मार्केट चे दोन मुख्य प्रकार आहेत त्यांची सविस्तर माहिती आपण घेऊया:

१. प्राथमिक शेअर मार्केट: एखाद्या कंपनीला व्यवसाय वाढविण्यासाठी जेव्हा भांडवल कमी पडते, तेव्हा ती कंपनी आपले शेअर्सची विक्री करून भांडवल उभा करू शकते. त्यासाठी कंपनीला पहिल्यांदा स्टॉक एक्सचेंजवर म्हणजे एन. एस. इ व बी. एस. इ. वर नोंदणी करावी लागते तेव्हा ती कंपनी प्रथम नोंदणी करते त्याला प्राथमिक शेअर बाजार असे म्हणतात. प्राथमिक नोंदणी नंतर कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगसाठी उपलब्ध होतात या सर्व प्रक्रियेला प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) असेही म्हणतात.

२. सेकंडरी शेअर मार्केट: प्राथमिक शेअर बाजारात प्रथम नोंदणी झाल्यानंतर किंवा आय. पी. ओ. स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट झाल्यावर ज्या गुंतवणूकदारांना आय. पी. ओ. मध्ये शेअर्स मिळाले आहेत, असे गुंतवणूकदार फायदा किंवा नुकसान दिसत असल्याने त्या शेअर्स ची विक्री करतात. ही सर्व प्रकिया शेअर ब्रोकर च्या माध्यमातून ट्रेडर व गुंतवणूकदार यांच्यामध्ये खरेदी विक्री ज्या मार्केट मध्ये होते त्याला सेकंडरी शेअर मार्केट असे म्हणतात. सेकंडरी शेअर बाजारात ब्रोकर च्या माध्यमातून ब्रोकर, ट्रेडर आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये सर्व सुलभ व्यवहार होतात.

प्राथमिक शेअर मार्केट आणि सेकंडरी शेअर मार्केट या दोन मुख्य प्रकारामुळे शेअर मार्केटमध्ये शेअर्स, बॉण्ड्स, डेरिव्हेटिव्ह आणि म्युच्युअल फंड या उत्पादनामध्ये खरेदी-विक्री ब्रोकर च्या माध्यमातून सुरळीत चालते.

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?

सोप्या शब्दांमध्ये, स्टॉक एक्सचेंज एक संस्था आहे जिथे कंपनीचे शेअर्स किंवा स्टॉक, बाँड आणि डेरिव्हेटिव्ह (किंवा इतर सिक्युरिटीज) चं ट्रेडिंग म्हणजे खरेदी-विक्री केली जाते. स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या फायनान्शियल सामग्रीचा (उदा. शेअर्स, बॉण्ड, डेरीव्हेटिव्ह आणि इतर सिक्युरिटी) व्यापार करते.

स्टॉक एक्सचेंज शेअर्स, बॉण्ड, कमोडिटी आणि इतर सिक्युरिटीज विकण्याची किंवा खरेदी करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडते. आपल्या भारत देशात भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड किंवा सेबी, जी मुंबई मध्ये आहे, ती संस्था या शेअर मार्केट मधील व्यवहाराचं नियमन आणि नियंत्रण करते.

शेअर मार्केट मध्ये दोन महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज बीएसई (सेन्सेक्स) आणि एनएसई (निफ्टी) आहेत. परंतु सेबी नुसार, भारतात एकूण सात मान्यताप्राप्त एक्सचेंज आहेत.

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय?

भारतीय शेअर बाजारातील दोन महत्वाचे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बी. एस. इ.) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन. एस. इ.)बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला सेन्सेक्स तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ला निफ्टी असे म्हणतात. या दोन्ही इंडेक्सचा उपयोग भारतीय शेअर बाजाराची स्थिती आणि परफॉर्मन्स मोजण्यासाठी केला जातो.

थोडक्यात, सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतीय शेअर मार्केटच्या बेंचमार्क इंडेक्स आहेत जे भारतीय स्टॉक मार्केट ची एकूण परिस्थिती दर्शवतात.

मार्केटमध्ये शेअर्सची किंमत कशी ठरते?

शेअर मार्केटमध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) द्वारे कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर नोंद होतात आणि नंतर सेकंडरी मार्केट मध्ये सार्वजनिक खरेदी-विक्री करण्यास सुरुवात करतात. शेअर्सची मागणी वाढली तर किंमत वाढते, आणि पुरवठा जास्त झाला तर किंमत कमी होते. पुरवठा आणि मागणी या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून शेअर्सची किंमत ठरली जाते.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा?

शेअर मार्केट हा संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग असला तरीही शेअर मार्केट म्हणजे काय किंवा शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे ते आपण पाहणार आहे.

शेअर मार्केट मध्येय ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करताना लक्षात ठेवाव्यात आशा महत्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत:

१. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्याकडे पूर्ण ज्ञान आहे की नाही याची खात्री करून घ्या.

२. शेअर मार्केटमधून आपल्याला काय हवे आहे आणि त्याबदल्यात आपली काय गमावण्याची तयारी आहे म्हणजे ध्येय आणि जोखीम निर्धारित करून निर्णय घ्या.

३. शेअर मार्केट मधून तुम्हाला एका वेळी किती पैसे कमवायचे आहे हे ध्येय निश्चित करा.

४. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपली रिस्क म्हणजे नुकसान किती करणार आहोत हे अगोदर निश्चित करा.

५. मार्केटमध्ये तुम्ही एखाद्या शेअर, म्युच्युअल फंड किंवा इतर साधनांची खरेदी करत आहात त्या साधनांमध्ये फायदा आणि नुकसान याच गुणोत्तर ठरवून घ्या. 

६. शेअर मार्केट मध्ये मोठे गुंतवणूकदार असतात त्यांच्याकडे फंड जास्त असतो त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. आपण खरेदी करत असताना अपल्याकडे असलेल्या भांडवलापेक्षा जास्त भांडवलाची खरेदी करत नाही ना याची खात्री करा.

७. शेअर मार्केट मध्ये तेच भांडवल गुंतवा, जे तुमचं सहा महिन्यांचा खर्च भागून शिल्लक आहे.

८. कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊन ते भांडवल शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू नका, शेअर बाजार खाली वर होत असतो त्यामुळे मार्केट मध्ये नफाच होईल याची खात्री देता येत नाही.

 ९. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असताना सर्व भांडवल एकाच कंपनी च्या शेअर्समध्ये न गुंतवता वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवले तर आपण नुकसान होण्याची क्षमता कमी करू शकतो.

१०. आजकाल सर्व बँका भरपूर मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड व त्यावर पैसे वापरन्याची परवानगी देतात, परंतु क्रेडिट कार्डवरून पैसे घेऊन गुंतवणूक करणे अधिक जोखम उचलणे होय.(Share Market in Marathi)

११. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः ची पद्धत तयार करा, जी तुम्हाला नुकसान कमी आणि फायदा जास्त मिळवून देईल.

निष्कर्ष:

आजच्या तंत्रज्ञान युगात, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व इन्व्हेस्टिंग करणे हा संपत्ती निर्माण करण्याचा सक्षम मार्ग आहे,आणि शेअर्सची खरेदी-विक्री करणं हे अगदी सोपं झालं आहे.शेअर मार्केट हे आपल्या आयुष्यातील दीर्घकालीन स्वप्न किंवा लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक करत असताना (Share Market in Marathi) शेअर मार्केट च्या नियमांचे पालन करणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. शेअर मार्केट बद्दल मूलभूत माहिती आपण या लेखात पाहिली, शेअर मार्केट ची मराठीमध्ये सर्व माहिती आपण भांडवल या आपल्या वेबसाईटवर मिळेल आणि तुम्ही शेअर मार्केट म्हणजे काय? मराठीमध्ये शिकू शकतात.

अधिक जाणून घ्या: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते?

अधिक जाणून घ्या: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?

Leave a Comment